पुण्यात किरकोळ भांडणातून मित्राचा खून: पसार आरोपी पोलिसांकडून गजाआड

पुण्यात किरकोळ भांडणातून मित्राचा खून: पसार आरोपी पोलिसांकडून गजाआड


पुणे13 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्माण माईन स्टोन साईट वरील तळमजल्यावर पत्र्याच्या रूममध्ये दिनेश रामविलास यादव (वय – 21 ,मूळ राहणार -उत्तर प्रदेश) याचा त्याच्या साथीदाराने किरकोळ भांडणाच्या वादातून खून केल्याचा प्रकार घडला होता. यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी पसार झालेला होता.

Advertisement

याप्रकरणी आरोपीचा शोध घेऊन त्यास कल्याण मधील शिवाजी चौक येथून ताब्यात घेतल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयाचे परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे.

विवेक गणेश पासवान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चार सप्टेंबर रोजी रावेत पोलिसांना पुणे मुंबई हायवे लागत रावेत या ठिकाणी दिनेश यादव यांचा मृतदेह मिळून आला होता. विवेक पासवान किरकोळ भांडणाच्या कारणावरून तोंडावर सिमेंटचा गट्टू त्यास गंभीर जखमी करून खून केला.

Advertisement

याप्रकरणी आरोपी विरोधात शिवकुमार घनश्याम प्रजापती ( वय -19 ) याने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विवेक पासवान याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र ,खुनातील आरोपी हा पळून गेल्याने त्याचा पोलिस शोध घेत होते.या गुन्ह्याचा तपास करत असताना ,पोलिसांना आरोपी गणेश जाधव हा गुन्हा केल्यानंतर देहूरोड येथील सेंट्रल चौक येथून एका टेम्पोत बसून मुंबईच्या बाजूने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आले. त्यानुसार आरोपीचे मित्र व जवळचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी करत असताना, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.आर. शिकलगार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, संबंधित आरोपी हा कल्याण परिसरात असल्याचे समजले.त्यानुसार रावेत पोलिस स्टेशनचे पथक कल्याण याठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीने पकडण्यात आले आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे ,अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे , सह्यक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी आर शिकलगार, विशाल जाधव , पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे , पोलिस हवालदार नंदलाल राऊत, रमेश तांबे ,संतोष तांबे ,विजयकुमार वाकडे , संतोष धवडे यांनी केली आहे.

Advertisement



Source link

Advertisement