पुण्यात कंपनीच्या प्रोजेक्टसाठी व्यावसायीकाची फसवणूक: 30 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने 1.50 कोटींची घातला गंडा


पुणे28 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुंबई आणि पुणे मधील विविध सेलेब्रिटींशी आपली ओळख असल्याचे सांगत, एका भामट्याने पुण्यातील केसनंद येथील कंपनीच्या प्रोजेक्टसाठी 30 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा बहाणा करून प्रासेसिंग फी आणि विविध कारणे सांगत, दीड कोटी रूपये घेऊन संबंधित पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

याप्रकरणी राघवेंद्र एन (रा. अदानी वेस्टर्न हाईट्स, मनीषनगर, अंधेरी, पश्चिम मुंबई)या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. याबाबत आशिष श्रीकांत सहाय (38, रा. ब्रम्हा सनसिटी वडगांव शेरी, पुणे) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आशिष सहाय आणि संशयीत आरोपी राघवेंद्र यांची पुण्यात ओळख झाली होती. याच ओळखीतून त्यांची वारंवार भेटल्याने आणि बोलणे केल्याने मैत्री झाली होती. पुण्यात आयपीएलच्या क्रिकेट मॅचच्या दरम्यान 2021 पासून त्यांच्या भेटी सुरू होत्या. सहाय यांचा गारमेंटचा व्यावसाय असल्याने, त्यांना त्यांच्या पुण्यातील केसनंद येथील प्रोजेक्टसाठी 30 कोटी रुपयांची आवश्यकता होती. यावेळी आरोपी राघवेंद्र याने सहाय याने त्याची ओळख आर्थिक सल्लागार असल्याचे सांगून त्याची मुंबई आणि पुण्यातील नामांकित सेलेब्रिटींशी ओळख असल्याचे सांगितले होते.

Advertisement

तसेच त्यांना 30 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचेही आश्वासन त्याने दिले होते. त्याच्या या आमिषास तक्रारदार हे बळी पडले. त्यानंतर राघवेंद्र याने त्यांच्याकडून 30 कोटीचे कर्ज देण्यासाठी प्रासेसिंग फी आणि विविध कारणे सांगून वेळोवेळी सुमारे दीड कोटी रूपये घेतले. परंतु, त्याने कुठल्याही प्रकारचे कर्ज मिळवून न देता सहाय यांनी दिलेल्या पैशाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैरवापर केला. दरम्यान आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार सहाय यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे आरोपीकडे मागितले असता त्याने ते न दिल्याने याबाबत त्यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement