पुणे13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहरानजीक लोणी-काळभोर पोलिस ठाणे परिसरात हातभट्टी चालविणार्या महिले विरुद्ध एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.सरस्वती संतोष राठोड (वय-36 रा. काळेशिवार, शिंदवणे, हवेली) असे स्थानबद्ध केलेल्या महिलेचे नाव आहे.
एक वर्षासाठी तिची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीएनुसार केलेली ही 41 वी कारवाई आहे.
सरस्वती राठोड हीने साथीदारांसह लोणी काळभोर हद्दीत गावठी हातभट्टी दारु तयार करणे, विक्रीसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. तिच्याविरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तिच्या विरोधात एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संबंधित महिलेला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, ए. टी. खोबरे, यांनी कामगिरी केली आहे.
आतापर्यंत ४१ सराईत गुन्हेगार स्थानबद्ध
पुणे शहरात दहशत निर्माण करणा-या तसेच अवैध बेकायदेशीर हातभट्टी दारु-ताडी निर्मीती व विक्री करणार्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतरची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची केलेली ही ४१ वी कारवाई आहे. सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.