पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
नेपाळ येथून लग्नाचे व नाेकरीच्या आमिषाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस एका व्यक्तीने पुण्यात पळवून आणून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला व तिची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका संशयितावर येरवडा पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आहे.
माेहम्मद रफिक शेख (वय – २३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३२ वर्षीय आईने संशयित आरोपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
अत्याचाराचा प्रकार ४/५/२०२३ ते आतापर्यंत घडला आहे. पोलीसंनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कालावधी दरम्यान संशयित आरोपी माेहम्मद शेख याने अल्पवयीन मुलीसाेबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिला लग्नाचे अमिषाने पुण्यात आणले. त्यानंतर येरवडा येथील एका फ्लॅटमध्ये तिला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, पीडित मुलीची आई पुण्यात येऊन तिने पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका करुन संशयित आरोपी विराेधात तक्रार दाखल केली. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस करत आहे.
महिलेसह तिच्या मुलावर ओळखीतील व्यक्तीचा अत्याचार
हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेची तरुणाने फोनवरुन ओळख केली. त्यानंतर तिच्याशी लगट सावत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्या पाच वर्षीय लहान मुलासोबतही अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार घडला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रथमेश चंद्रकांत साेकटे (रा. बारामती, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. या तरुणाची महिलेशी फाेनद्वारे ओळख झाली हाेती. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच पती साेबत एका दिवसांत फारकत करुन देण्याचे आमिषही तिला दाखवले. त्यानंतर तिला स्वारगेट परिसरातील एका लाॅजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
संशयित एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या पाच वर्षीय मुलासाेबतही जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक कृत्य करुन महिलेकडून चार लाख रुपये घेतले. या प्रकरणी संशयितावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.