पुण्यातील नामांकित व्यवसायिकांचा कारनामा: बिबट्याची शिकार करुन अवयव लपवले फार्महाऊसमध्ये; दोघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील नामांकित व्यवसायिकांचा कारनामा: बिबट्याची शिकार करुन अवयव लपवले फार्महाऊसमध्ये; दोघांवर गुन्हा दाखल


पुणे40 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील स्वतःच्या फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे वन विभागाने याबाबत छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला आहे. याप्रकरणी विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (दोघे, रा. डेक्कन जिमखाना ,पुणे) या आरोपीच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

एका महिलेने दिली संपूर्ण माहिती

प्रसिद्ध फर्ग्युसन रस्त्यावरील नामांकित हॉटेल वैशालीच्या मालकी हक्काच्या वादातून जाधव बंधूंविरुद्ध यापूर्वी गुन्हा वेगवेगळ्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत जबाब नोंदविण्याचे काम सुरु असताना, एका महिलेने जाधव यांच्या खडकवासला धरण परिसरातील मांडवी खुर्द गावातील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती दिली होती. याबाबत वन विभागाकडेही तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपी पसार झाले असून, पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

वनविभागाकडून कारवाई

वन विभागाला माहिती मिळाली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथील एका कपाटात बिबट्याचा नखांसह पंजा सापडला आहे. दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याने तोडफोड करुन कामगारांना मारहाण केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी विश्वजित जाधव याच्यासह चौघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement



Source link

Advertisement