एका तासापूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
पुण्यातील गजबजलेल्या मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात दुकानांना मोठी आग लागली असून अग्निशामक विभागाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्निशामक दलाची आठ अग्निशामक वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.
Advertisement
या परिसरात असणाऱ्या सुमारे सात ते आठ दुकानांना आग लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. नेमकी आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र या भागात वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर आदींची दुकाने असल्यामुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीत कोणतेही जीवित हानी झालेली नाही. मात्र, सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement