पुणे8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात एका न्यायधीश यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी गेलेल्या आरोपीने कटघरातून उडी मारत त्यानंतर जवळील न्यायालयाच्या २० फूट उंची च्या भिंतीवरुन उडी मारुन पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सदर कायद्याचा पाठलाग करत त्यास जेरबंद केल्याची माहिती दिलेली आहे.
दीपक शिवाजी जाधव (वय २८, रा. कात्रज,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन शिंदे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने जाधव याच्या विरुद्ध वाॅरंट बजावले होते. वाॅरंट रद्द करण्यासाठी जाधव न्यायालयात आला होता.
न्यायालयात सुनावणी सुरू असताना, अचानक जाधव न्यायालयीन कक्षातून पळाला आणि २० फूट भिंतीच्या उंचीवरुन उडी मारली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. न्यायालायने जाधव याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जाधव याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले
पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी एकाला धमकावून त्याला ठार मारण्याची धमकी टोळक्याने दिली. त्याशिवाय कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयता मारुन नुकसान केल्याची घटना १८ मार्चला पाच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील बनस कॉफी शॉपमध्ये घडली.
निखील मधुकर कांबळे, हुसेन उर्फ सोन्या युनूस शेख, हर्ष जाधव, सिद्धार्थ भोला, साहिल पिटर कांबळे, सुदेश रुपेश गायकवाड, तुषार चव्हाण अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित वाघमारे (वय २१ रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखील कांबळे सराईत असून रोहितने काही दिवसांपुर्वी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात ठेउन आरोपी निखीलने साथीदारांना जमवून १८ मार्चला बनस कॉफी सेंटरमध्ये रोहितला गाठले. त्याला पोलिस ठाण्यातील केस मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर टेस्टी बन कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयत्याने मारुन नुकसान करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.