पुण्यातील कोंढवा बुद्रूकमधील शांतीनगरमधील घटना: कामावर मद्यपान केल्यामुळे कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर केला वार

पुण्यातील कोंढवा बुद्रूकमधील शांतीनगरमधील घटना: कामावर मद्यपान केल्यामुळे कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर केला वार


पुणे5 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एका सुरक्षा रक्षकाने कामावर मद्यपान केल्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून त्याने मालकावर वार करुन गंभीररित्या जखमी केले. ही घटना कोंढवा बुद्रूकमधील शांतीनगर सोसायटी परिसरात घडली आहे.सुधीर बनसोडे असे गंभीर जखमीचे नाव आहे.

Advertisement

याप्रकरणी विष्णू शिवशरण (वय -43, रा. सुखसागरनगर ,कोंढवा,पुणे)यांनी आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू शिवशरण यांचे मेहुणे सुधीर बनसोडे यांची केएसएमएस नावाची सुरक्षा एजन्सी आहे. विविध सोसायटींना सुरक्षा रक्षक नेमणूक केले जातात. 12 सप्टेंबरला सुधीर शांतीनगर सोसायटी परिसरातील सुरक्षा रक्षक व्यवस्थित कामावर हजर आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी एकजण मद्यपान करुन कामावर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले. त्याच रागातून संबंधिताने सुधीरला बांबूने मारहाण करुन वार करीत गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

जेष्ठ नागरिकाची फसवणूक

एका ज्येष्ठ नागरिकास अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल ऍक्टिव्हेट करून देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका 71 वर्षीय व्यक्तीने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत दिलीप छतानी (रा. कॅम्प,पुणे) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी अमेझॉन प्राईमची मेम्बर्शीप मिळवण्यासाठी गुगलवर सर्च केले. त्यामध्ये दिलेल्या कस्टमर केयरच्या नंबरवर त्यांनी फोन केला.

Advertisement

अज्ञात व्यक्तीने कस्टमर केयरमधून बोलत असल्याचे त्यांना भासवून अमेझॉन प्राईमची फ्री ट्रायल तात्काळ ऍक्टिव्हेट करून देतो असे सांगितले. तक्रारदार यांचा विश्वास झाल्याने त्यांनी याबाबत सहमती दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठवून अप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले. अप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर तक्रारदार यांच्या मोबाईलचा रिमोट ऍक्सेस मिळवून त्यांच्या बँकेच्या खात्यातून 3 लाख 66 हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Advertisement