पुणे हादरले: ​​​​​​​पत्नीसह आठ वर्षांच्या मुलाचा खून करून आयटी इंजिनिअरची आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात


पुणे29 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • मृत दांपत्य पश्चिम बंगालचे; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

एका आयटी इंजिनिअरने आधी पत्नीचा पाॅलिथीन पिशवी डाेक्यात अडकवून गळा दाबून खून केला. त्यानंतर आठ वर्षांच्या मुलालाही त्याने जिवे ठार मारले व स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी उघडकीस आला. प्रियंका सुदीप्ताे गांगुली (४०), मुलगा तनिष्क गांगुली (८) आणि सुदीप्ताे गांगुली (४४) अशी मृतांची नावे आहेत.

Advertisement

गांगुली कुटुंबीय मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. मागील १७ ते १८ वर्षांपासून कामानिमित्त ते पुण्यात वास्तव्यास आहेत. हिंजवडी परिसरातील नामांकित टीसीएस कंपनीत सुदीप्ताे हा चांगल्या पगाराची नाेकरी करत हाेता, तर त्याची पत्नी गृहिणी हाेती. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अजून कळू शकले नाही.

सुदीप्ताेचा याचा भाऊ बंगळुरू येथे कामास असून मंगळवारी संध्याकाळी ताे भावाला फाेन करत हाेता, परंतु काेणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने एका मित्राला भावाच्या घरी जाण्यास सांगितले व हा प्रकार उघडकीस आला.

Advertisement

भावाची तक्रार, पोलिसांना लाेकेशन घरातच सापडले
पाेलिसांनी मिसिंग व्यक्तीचे लाेकेशन तपासले असता ते घरातच असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी दरवाजाचा कडीकाेयंडा ताेडून घरात प्रवेश केल्यावर एका खाेलीत सुदीप्ताे गळफास घेतलेल्या अवस्थेत हाेता, तर दुसऱ्या खाेलीत बेडवर पत्नी व मुलाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह पाेलिसांना मिळून आला. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. गांगुली कुटुंबीय राहत असलेले घर हे भाड्याने घेतलेले हाेते व मागील तीन वर्षांपासून ते येथे राहत होते. तिघेही सर्वांशी चांगले बोलायचे असेही येथील नागरिकांनी सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement