- Marathi News
- Local
- Maharashtra
- Pune
- A Flurry Of Sandalwood Thieves In The City Of Pune, The Manner Of Cutting Sandalwood Trees From Many Parts Of The City Is Revealed
पुणे38 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहरात सध्या चंदन चोरट्यांनी विविध भागात धुमाकूळ घातला असून कर्वेनगर, हडपसरमधील महमदवाडी परिसरात चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील स्नेह सहकारी गृहरचना संस्थेच्या आवारात राहतात. अज्ञात चोरटे मध्यरात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात शिरले. साेसायटीच्या कार्यालयाच्या आवारातील चंदनाचे झाड कापून चोरटे अंधारात पसार झाले. सहायक पोलीस फौजदार महेश निंबाळकर याबाबत पुढील तपास करत आहेत.तर दुसऱ्या घटनेत महमदवाडी परिसरातील गुलामअलीनगर परिसरातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले. याबाबत आसिफ सैय्यद (वय- 37, रा. महमदवाडी रस्ता, हडपसर,पुणे) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस कर्मचारी व्ही. व्ही. जगताप पुढील तपास करत आहेत.
अशाचप्रकारे काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी खडकी परिसरातील किर्लोस्कर कंपनीच्या आवारात शिरुन चंदनाची झाडे कापून नेली होती. त्यावेळी चंदन चोरट्यांनी सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता.
टोळक्याकडून विक्रेत्याला मारहाण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन वाद झाल्याने एका टोळक्याने विक्रेत्याला मारहाण करुन स्टाॅलची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण सहाजणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मंगाराम टिकारामजी बावरी (वय 65, रा.हडपसर,पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बावरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अल्पवयीन मुलांसह रोहन शिवराज गुजर (वय 18), प्रसाद नारायण पाता (वय 18), सूरज व्यंकटसुखया देवरेड्डी (वय 20), कीर्ती पिल्ले (वय 19) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार बावरी यांचा गणेश मूर्ती विक्रीचा स्टाॅल आहे. एस. एम. जोशी महाविद्यालयाजवळील स्टाॅलच्या परिसरात त्यांनी स्टाॅल थाटला आहे. आरोपी हे गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी आले. मात्र, गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन आरोपींनी बावरी यांच्याशी वाद घातला. बावरी यांना शिवीगाळ करुन स्टाॅलची तोडफोड केली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले पुढील तपास करत आहेत.