पुणे वनविभागाची अतिक्रमण निर्मलन कारवाई: सिंहगडावरील खादयपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटवले


पुणे29 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

प्रतापगड किल्ल्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवल्यानंतर वन विभागाने पुण्यातील किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व व तसेच गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता सिंहगडाचे पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत विखुरलेल्या खादयपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून टाकले आहे. अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय स्टॉल धारक यांचेशी चर्चा करुन वन विभागाकडून करण्यात आला.

Advertisement

किल्ले सिंहगडावर गेल्या काही वर्षापासून गडाच्या पार्किंगपासून ते माथ्यापर्यंत खादयपदार्थ स्टॉल धारकांनी विविध ठिकाणी प्लास्टिक पेपर्स वापरुन अतिक्रमण केल्याचे निदर्शनास येत होते. सदर अतिक्रमण धारकांना कायदेशीर पध्दतीने वन विभागाकडून सुरवातीला नोटीस देण्यात आल्या असून वन विभागामार्फत अवैध झोपडयांचे निष्कासन करण्यांत आलेले आहे. सदर अतिक्रमण निष्कासन झाल्यानंतर किल्ले सिंहगडाला असलेला ऐतिहासिक वारसा, तसेच गडाचे सौंदर्य अबाधित होणार आहे.

सदरील स्टॉल धारकांना निसर्ग पर्यटन योजनेतंर्गत सोय करणेबाबत वनविभाग विचाराधीन असून सदर अतिक्रमण धारकांना समान रोजगार निर्मितीचा प्रश्न संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांमार्फतच सोडविण्यात आला आहे.

Advertisement

पार्किंगसाठी मिळणार अधिक जागा

अतिक्रमण काढल्यानंतर पार्किंगची देखील जागा विस्तरणार आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. परिणामी शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी होणारे वाहतुक कोंडी टाळता येईल. सदर अतिक्रमण मोहिमेस पोलिस विभागाचे अधिकारी / कर्मचारी व स्थानिक नागरीकांनी, संस्थांनी सकारात्मक रित्या सहकार्य केल्याने वनविभागातर्फे आभार मानण्यात आले.

Advertisement

ही कार्यवाही एन. आर. प्रविण, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे यांचे मार्गदर्शन व राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे यांचे निर्देशानुसार दिपक पवार, सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग, पुणे यांचे नेतृत्वात प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा, मुकेश सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुशील मंतावार, वनपरिक्षेत्र अधिकारी, संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, हनुमंत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजित सुर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे अधिनस्त असलेले वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी व पोलिस प्रशासन यांचेकडून करण्यात आली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement