एका तासापूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता असल्याचे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी पुण्यात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या संदर्भात अजित पवार म्हणाले की, ‘मला एक बातमी अशी कळाली आहे. मला वाटत होते की, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले, त्यामुळे पोट निवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी आतल्या गोटातील माहिती मला मिळाली.’ असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
काँग्रेसचा मतदारसंघावर दावा
अलीकडेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावा सांगायला सुरुवात केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एवढी घाई का? असा प्रश्न उपस्थित केला होता. गिरीश बापट यांना जाऊन काही दिवसच झाले आहेच. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असे खडे बोल त्यावेळी अजित पवार यांनी सुनावलले होते.
गिरीश बापट यांच्या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…
RSS चे स्वयंसेवक ते राष्ट्रीय पातळीवरील नेते:नगसेवक, आमदार, खासदार अशी राहिली गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द
खासदार गिरीश बापट हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. मात्र, नंतरच्या काळात जनसंघाची स्थापना झाली आणि गिरीश बापट हे देखील राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक पदापासून सुरुवात केली असली तरी कमी कालावधीच ते आमदार आणि नंतर खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाले. 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुण्यातीलच नव्हे तर राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. एक कामगार नेता म्हणून देखील त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. त्यांनी भाजपमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. पूर्ण बातमी वाचा…