पुणे4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हडपसर भागातील रामटेकडी येथे दहशत निर्माण करणाऱ्या शुभव उर्फ चम्या कांबळे आणि त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी शहरातील 57गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख शुभम उर्फ चम्या कांबळे (वय-१९, रा. रामटेकडी हडपसर, मूळ रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), टिल्ली उर्फ इरफान गुलाम मोहम्मद शेख (वय-19) मंगेश रवी जाधव (वय-20, दोघेही रा. रामटेकडी हडपसर), फिटर प्रेम्या उर्फ प्रेम अनिल थोरात (वय-19, नवीन म्हाडा कॉलनी हडपसर) कांबळे, शेख, जाधव, थोरात यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी रामटेकडी भागात एका दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कांबळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विनय पाटणकर,उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त रंजकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलिस आयुक्तांनी आरोपी कांबळे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 57 गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.