पुणे पोलिसाचा कुंटणखान्यावर छापा: बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांसह 7 जणांना पोलिसांनी पकडले

पुणे पोलिसाचा कुंटणखान्यावर छापा: बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांसह 7 जणांना पोलिसांनी पकडले


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Police Nabs 7 People Including Five Bangladeshi Women Living Illegally In Pune, Raids Kuntankhana And Detains Minor Bangladeshi Girl

पुणे9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांसह सात जणांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. पोलिसांच्या पथकाने एका कुंटणखान्यावर छापा टाकून अल्पवयीन बांगलादेशी मुलीला ताब्यात घेतले. आठवडाभरापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह 19 जणांना पकडले होते.

Advertisement

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बांगलादेशी महिला, त्यांचे साथीदार बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून पाच बांगलादेशी महिलांसह सात जणांना ताब्यात घेतले. चौकशीत एका कुंटणखान्यात बांगलादेशी अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने अल्पवयीन मुलीची कुंटणखान्यनातून सुटका केली. बांगलादेशी महिला आणि नागिरकांकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या 5 बांगलादेशी महिला या वेश्या व्यवसाय करत होत्या. तर त्यांच्या सोबत असणारे पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करत होते. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी सात बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमांन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृ्त्त केल्याप्रकरणी तीन दलालांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, राजेश माळगावे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमेय रसाळ, सागर केकाण आदींनी ही कारवाई केली.Source link

Advertisement