पुणे पोलिसांची कारवाई: शहरात जप्त केलेले 5 कोटींचे अंमली पदार्थाचा साठा नष्ट

पुणे पोलिसांची कारवाई: शहरात जप्त केलेले 5 कोटींचे अंमली पदार्थाचा साठा नष्ट


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे पोलिस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 21 पोलिस ठाण्यातील पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी नष्ट केलेल्या अंमली पदार्थांमध्ये गांजा, कोकेन, मेफेड्रोन (एम डी), चरस, हिरॉईन अशा ड्रग्जचा समावेश होता. 4 कोटी 75 लाख 53 हजार रूपये किमतीच्या अमली पदार्थांची रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीत विल्हेवाट लावण्यात आली.

Advertisement

पोलिसांनी नष्ट केलेल्या अंमली पदार्थांमध्ये 67 लाख 78 हजार 20 रुपय किमतीचा 338 किलो 901 ग्रॅम 291 मिलीग्रॅम गांजा, 1 कोटी 97 लाख 17 हजार 214 किंमतीचे 1 किलो 114 ग्रॅम 481 मिलीग्रॅम मेफेड्रोन (एमडी), 2 कोटी 13 लाख 94 हजार 485 रुपय किंमतीचे 1 किलो 426 ग्रॅम 299 मिलीग्रॅम कोकेन, 19 लाख 66 हजार रुपये किमतीचे 1 किलो 966 ग्रॅम चरस, 2 लाख 87 हजार 530 रुपये किमतीचे 28 किलो 753 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ, 4 लाख 9 हजार 872 रुपये किंमतीचे 136 ग्रॅम 624 मिलीग्रॅम हेराईन असा एकूण 4 कोटी 75 लाख 53 हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.

राज्याचे पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागाच्या परिपत्रकानुसार पुणे शहर आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, कमिटी सदस्य पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार, सहायक रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, वैज्ञानिक सहाय्यक प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा पुणेचे प्र. अ. लेंडे, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ पुणेचे प्रमोद डोके, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बी विभाग विठ्ठल बोबडे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जी विभाग एस.के. कोल्हे यांच्या उपस्थित अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.

Advertisement

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार, पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनिल थोपटे, आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, शिवाजी घुले, पोलिस अंमलदार राहुल जोशी, संतोष देशपांडे, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड यांनी केली.



Source link

Advertisement