पुणे पोलिसांची कारवाई: लोणीकंद परिसरातून चोरी गेलेले 21 मोबाईल मिळाले परत


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 21 Stolen Mobile Phones Were Recovered From Lonikand Area And Stolen Mobile Phones Were Recovered From Various Districts Of The State.

पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मोबाईल हरविल्याच्या अनेक घटनांची नोंद ऑनलाईनरित्या पोलिसांकडे केली जाते. त्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाला तब्बल 21 मोबाईल परत मिळविण्यात यश आले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी गुरवारी दिली आहे. सदरचे मोबाईल राज्यातील विविध जिल्ह्यातून बीड, नाशिक, नांदेड तसेच पुण्यातून जप्त करण्यात आले आहे. सदर चोरीचे मोबाईल संबंधीत तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत त्यामुळे त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

Advertisement

लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल हरविल्याबाबत तक्रारी मागील काही दिवसांपासून दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन हरवलेले मोबाईल फोन यांचा शोध घेण्याचे आदेश लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी पोलीस ठाण्यातील सायबर पथकास दिले होते. त्या अनुषंगाने सायबर पथकाने हरविलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून राज्यातील विविध भागातून अनेकजणांना कडून मोबाईल जप्त केले आहे. त्यामध्ये विविध कंपन्याचे विविध 21 मोबाईल जप्त करण्यात आले. संबंधित कारवाई वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, गुन्हे निरीक्षक मारूती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज गोरे, अमंलदार समीर पिलाणे, सागर पाटील, किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

कोंढवा पोलिसांकडून 12 चोरीचे मोबाईल हस्तगत

Advertisement

पायी चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल जबरीने चोरी करणारे आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. उमर सलीम शेख (वय – 19, रा. उरळी देवाची, पुणे ) आणि कादिर शेख ( 19 ,रा.उरळी देवाची, पुणे) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीचे एकूण एक लाख 23 हजार रुपये किमतीचे 12, मोबाईल जप्त केले आहे. कोंढवा पोलिस स्टेशन अंतर्गत हांडेवाडी भागातील पायी चालणाऱ्यांचे मोबाईल चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने कोंढवा पोलिस तपास करत असताना, एका अल्पवयीन मुलासह दोन आरोपी मोटरसायकल वरून मोहम्मद वाडी परिसरात दिल्ली पब्लिक स्कूल जवळ थांबल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सदर आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचे मोबाईल हस्तगत केले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement