पुणे पोलिसांकडून 15 दिवसात चौथ्यांदा कोम्बिंग ऑपरेशन: 3 हजार 715 गुन्हेगारांची तपासणीत 650 गुन्हेगार मिळाले


पुणे11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ऑपरेशन ऑलआउट राबविण्यात आले. त्यानुसार मंगळवारी रात्री नऊ ते बुधवार मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तब्बल 3 हजार 715 गुन्हेगारांची तपासणी केली असता 650 गुन्हेगार पोलिसांना मिळून आले आहे.वेगवेगळया कारणाने शहरात मागील 15 दिवसांमध्ये चार वेळा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

Advertisement

पोलिसांनी सदर काॅम्बिंग ऑपरेशन मध्ये गुन्हेगारांची तपासणी करणे, हाॅटेल, लाॅजेस, ढाबे,एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन व सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयित इसमांची कसून तपासणी केली. त्यामध्ये आर्म अ‍ॅक्टप्रमाणे 37 जणांना अटक करून त्यांच्याकडून 34 कोयते, एक तलवार दोन सत्तूर असा शस्त्रसाठा जप्त केला. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी शहरभरात मोहिम राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांकडून 592 हॉटेल, ढाबे, लॉजेस तपासण्यात आले. तसेच 171 बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानकावर तपासणी करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विराेधी पथक एकने येरवडयात ताैफीक शेख या आराेपीस अटक करुन त्याच्या ताब्यातून दाेन लाख रुपये किंमतीचे मेफेड्राॅन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तर, पथक दाेनने विश्रांतवाडी परिसरात साहिल जयंत मानकर (वय-21,रा.गडचिराेली) या आराेपीस अटक करुन एक लाख रुपये किंमतीचा पाच किलाे गांजा जप्त केला आहे. पोलिसांकडून नाकाबंदीदरम्यान 1 हजार 463 संशयित वाहन चालकांना अडवून तपासणी करण्यात आली. त्याशिवाय वाहतूक विभागाकडून 1 हजार 61 संशयित वाहनचालकांना अडविण्यात आले. त्यापैकी 154 जणांकडून 1 लाख 7 हजारांची दंडवसुली करण्यात आली. मुंबई प्राेव्हीबीशन अॅ:क्ट प्रमाणे गुन्हे शाखेने 18 केसेस तर पोलिस स्टेशनने 49 केसेस करुन गावठी दारु व विदेशी बाॅटल असा 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, महा.जुगार अॅक्ट प्रमाणे एकूण 19 केसेस मध्ये 78 आराेपींना अटक करुन दाेन लाखांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement