पुणे क्राईम: मोटार सायकल चोरणाऱ्या चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त


पुणे29 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एसीबी) मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. यासह साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

प्रकाश महादु दुधवडे( वय -23 वर्षे, रा. पोखरी, पवळदरा, ता. संगमनेर, जि.अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चोरी प्रकरणात वाढ

Advertisement

पुणे ग्रामीण मध्ये मागील वर्षभरात सायकल चोरींच्या प्रकरणात कमालीची वाढ दिसून आली. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार 9 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मोटार सायकल चोरावर मोठी कारवाई करत दहा लाख रूपये किंमतीच्या एकुण 29 मोटार सायकली हस्तगत करत एकुण 26 गुन्हे उघडककीस आणले होते.

अहमदनगरमध्ये कारवाई

Advertisement

सायकल चोरीच्या प्रकरणातच अहमदनगर जिल्ह्यातही पोलिसांनी कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले आहे. अहमदनगर शाखेचे सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, पोना संदिप वारे, पोका अक्षय नवले या पथकाने ही कारवाई केली.

प्रकाश महादु दुधवडे (वय २३ वर्षे, रा. पोखरी, पवळदरा, ता. संगमनेर, जि.अहमदनगर) यास आळेफाटा बोटा खिंड परीसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे पुणे ग्रामीण,अहमदनगर जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले असून एकूण साडेतीन लाख रूपये किमतीच्या दहा मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.

Advertisement

दुसरी मोठी कारवाई

या आठवडयात स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामध्ये एकुण 39 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून एकुण 32 गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement