पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थांना आराेग्य सुरक्षेचे कवच: श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टचा नाशिकच्या सुयश हाॅस्पिटलशी सामंजस्य करार


नाशिक40 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमध्ये कार्यरत कर्मचारी,सेवक व पुजाऱ्यांसह सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्टने घेतला आहे. या कर्मचारी, सेवक व पुजाऱ्यांसह ग्रामस्थांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ट्रस्टने नाशिकमधील सुयश हॉस्पीटल सोबत सामंजस्य करार केल्याची माहिती ट्रस्ट अध्यक्ष व जिल्हा न्यायाधीश श्री वर्धन देसाई यांनी दिली.

Advertisement

ट्रस्ट आणि सुयश हॉस्पीटलच्या वतीने गडावरील सर्व नागरिकांना आरोग्य कार्ड उपलब्ध करून दिले जाणार असून या आरोग्य कार्डाच्या माध्यमातून आरोग्य शिबीरांमध्ये मोफत निदान,तसेच रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आल्यास सवलतीच्या दरात संबधितांवर उपचार केले जातील असे देसाई आणि हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.हेमंत ओस्तवाल यांनी स्पष्ट केले. या सामंजस्य करारावर ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे आणि सुयश हॉस्पीटलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ.हेमंत ओस्तवाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री वर्धन देसाई, विश्वस्त व तहसीलदार बंडू कापसे, अ‌ॅड. ललीत निकम, अ‌ॅड. दीपक पाटोदकर, डॉ. प्रशांत देवरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

सवलतीच्या दरात उपचार

Advertisement

विश्वस्त संस्थेचे कर्मचारी ,सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ आजारी पडू नये,मात्र आजारी झाल्यास लवकरात लवकर कसे बरे व्हावे या विषयी डॉ. श्री. हेमंत ओस्तवाल यांनी मौजे सप्तशृंगगड येथे संपुर्ण भारतभर गाजलेले दिलेले निरामय आरोग्य अर्ध्या दिवसाचे वर्कशॉप घेतले जाणार आहे.तसेच सप्तशृंगगडावरील जेष्ठ नागरीकांसाठी सांधे दुखू नयेत किंवा सांधे बदलण्याची वेळ येवूच नये याविषयी शिबार घेतले जातील.

यासाठीच हाडांचे घनता चाचणी म्हणजे बोन डेन्सिटी तपासणी संपूर्णपणे गडावरच निशुल्क केली जाणार आहे.बोन डेन्सिटीकरीता क प्रति मानसी तीन हजार रुपये खर्च असून ही तपासणी हॉस्पीटल संपूर्णपणे मोफत करणार आहे. तसेच सप्तशृंगगडावरील विश्वस्त संस्थेचे कर्मचारी तसेच गावातील स्त्री पुरुष यांना कोणत्याही आजारा संबंधी सुयश हॉस्पिटल, नाशिक येथे भरती केल्यास तज्ञ डॉक्टरांचा तपासणी तसेच उपचाराअंती रुग्णांकरीता येणाऱ्या खर्चात तीस टक्के सवलत दिली जाणार असल्याचे संमतीने जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement