औरंगाबाद11 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पिसादेवी येथे गत सहा दिवसांपासून तीन तरूणांनी आंतरवाली आंदोलनास पाठिंबा व मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. तसेच दररोज येथे वेळवेगळ्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. मंगळवारी आगळ्या वेगळ्या गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून सरकारला चांगली बुद्धी सुचावी अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी गोंधळ घालण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सर्वपक्षीय मंत्री मंडळाच्या बैठकीतून मनोज जरांगे यांनी अमरण उपोषण मागे घ्यावे, यासाठी एकमताने ठराव संमत केला आहे. एक महिन्याचा वेळही मागीतला आहे. यावर जरांगे यांनी पाच अटी ठेवल्या आहेत. मात्र, तसेच १२ ऑक्टोबरपर्यंत विविध माध्यमातून आंदोलनही सुरुच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील पिसादेवी येथेही गत सहा दिवसांपासून पंढरीनाथ गोडसे पाटील, अमित जाधव आणि भरत कदम यांनी अमरण उपोषण सुरु केले आहे. ठिय्या, निदर्शने, रस्ता रोको, आत्मदहन, भजन प्रवचन आणि मंगळवारी सायंकाळी सात वाजता गोंधळ आंदोलनाचा लक्षवेधी कार्यक्रम त्यांनी घेतला.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
आडगाव सरग येथेही गत सहा दिवसांपासून अमरण उपोषण आंदोलन सुरु आहे. आंतरवाली सराटी प्रमाणेच आडगाव, बोरवाडी, डोणवाडा, अंजनडोह, लामकाना, नायगव्हाण, हातमाळी येथे साखळी उपोषण, निदर्शने, ठिय्या आंदोलन आदी विविध माध्यमातून आंदोलन सुरु राहणार असल्याचे ज्ञानेश्वर पठाडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. तसेच गावा गावातही विविध माध्यमातून आंदोलन सुरु आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा निश्चिय सकल मराठा समाजाने केल्याची माहिती सुरेश वाकडे पाटील, चंद्रकांत भराट व आंदोलकांनाही दिली. १७ सप्टेंबर रोजी काळा दिवस पाळण्याचेही आव्हान केले जात आहे.
बागडे यांच्या कार्यालसामोर उपोषण
आमदार हरिभाऊ बागडे यांनी मराठा आरक्षणा विषयाची भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारपासून अमरण उपोषण सुरु केले आहे. याकडे बागडे यांनी दोन दिवसांत डोंकूनही पाहिले नाही. त्यामुळे आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती
मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुस्लिम आरक्षणाचा आद्यादेश काढावा, यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.