अकोला5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पावसाने जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात हजेरी लावल्याने पश्चिम विदर्भातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील १३ मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मात्र ९ मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ एका प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात एकुण ९ मोठे प्रकल्प, २७ लघु प्रकल्प तर २४५ लघु प्रकल्प आहे.
या प्रकल्पामुळे ३०८१.९० दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. पावसाच्या आगमनाने तुर्तास २०८४.३९ दशलक्ष घनमिटर (६७.६३ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम विदर्भातील विविध शहराना पाणी पुरवठा केला जातो. तसेच पाचही जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरु असल्याने १३ मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परिणामी प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू
अमरावती जिल्ह्यातील पंढरी, गर्गा. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी,वाघाडी, बोरगाव, नवरगाव. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा,उमा, घुंगशी बॅरेज. वाशिम जिल्ह्यातील अडाण आणि सोनल या मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
उर्ध्व वर्धाचे दोन दरवाजे उघडले
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे दोन दरवाजे ४० सेंटीमिटरने उघडण्यात आले असून यातून १२६ क्युमेक प्रतिसेंकद पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
खडकपूर्णा प्रकल्प ठरला अपवाद
पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असली तरी यात बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प अपवाद ठरला आहे. खडकपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ९३.४० दशलक्ष घनमिटर आहे. तुर्तास प्रकल्पात केवळ ५.०६ दशलक्ष घनमिटर जलसाठा उपलब्ध झाला आहे.
मोठ्या प्रकल्पातील जलसाठा असा
- – उर्ध्व वर्धा प्रकल्प – ४७९.५४ दलघमी – ८५.०२ टक्के
- -पुस प्रकल्प – ७५.४३ दलघमी — ८२.६५ टक्के
- – अरुणावती प्रकल्प – १४३.०० दलघमी – ८४.२८ टक्के
- – बेंबळा प्रकल्प -७७.२७ दलघमी – ४२.०१ टक्के
- – काटेपूर्णा प्रकल्प – ५६.५२ दलघमी -६४.४५ टक्के
- – वान प्रकल्प – ५५.०५ दलघमी – ६७.१८ टक्के
- – नळगंगा प्रकल्प – १८.३६ दलघमी – २६.४९ टक्के
- – पेनटाकळी प्रकल्प – २८.३९ दलघमी – ४७.३४ टक्के
- – खडकपूर्णा प्रकल्प – ५.०६ दलघमी – ५.४२ टक्के