पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात माेठया प्रमाणात अंमली पदार्थाचे प्रमाण मागील काही काळात वाढलेले असून तरुण पिढी अंमली पदार्थाचे अाहारी जात अाहे.हे व्यसन मुलांना वेगवेगळया वळणाला लावत असल्याने याबाबत पाेलीसांनी वेळीच अाळा घालावा. पाेलीसांना नेहमीच्या पध्दती बाहेर जाऊन उपाययाेजना करावा अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी दिल्या अाहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड पाेलीस अायाेजित पिंपरी चिंचवड पाेलीस अायुक्तलयाचे पाच वर्षाचा मागाेवा व वाटचाल या विषयावर ते बाेलत हाेते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभाेर, सरचिटणीस सुकृत माेकाशी, पाेलीस अायुक्त विनयकुमार चाैबे ,सहपाेलीस अायुक्त संजय शिंदे , वसंत परदेशी ,पाेलीस उपायुक्त विवेक पाटील, पाेलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गाेरे यांच्यासह वरिष्ठ पाेलीस अधिकारी, अामदार अश्विनी जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसाेडे उपस्थित हाेते.
पाटील म्हणाले, कायदा अाणि सुव्यवस्था टिकून रहावी तसेच सर्वांना शांत झाेप लागावी याकरिता पाेलीस रात्र-दिवस काम करत असतात. पुण्यात अातंकवाद्याची एक लिंक सापडली त्याचे धागेदाेरे लांबपर्यंत जात अाहे. अापली झाेप उडेल अशा लिंक मिळून अाल्या अाहे. अशाप्रकारचे अनेक गाेष्टीचा तपास पाेलीस करत असतात. पिंपरी चिंचवड पाेलीस अायुक्त चाैबे यांना २६ वर्षाचे उल्लेखनीय कारकीर्दीनंतर राष्ट्रपती पदक मिळाले याबद्दल त्यांचे अभिनंदन अाहे.महिला अत्याचार विराेधात दामिनी पथक हे अधिक सक्षम केले पाहिजे त्यांची गस्त वाढवली पाहिजे. दामिनी पथकातील मार्शलने दाेषींना असे फटके द्यावे की, त्यांची दहशत निर्माण झाली पाहिजे. अापली ताकद इतकी वाढवयाची की ती वापरु लागू नये परंतु त्याच्या भितीने प्रश्न संपले पाहिजे. त्यांना दुचाकी, कार, अावश्यक अधिकार दिले पाहिजे. पाेलीस चाैक्याची दुर्लक्षता असते त्याठीकाणी याेग्य वातावरण नसते. त्यामुळे पुणे शहरातील १०० पाेलीस चाैक्या व्यवस्थित करुन त्याठिकाणी अावश्यक पायाभूत सुविधा पुरवल्या जातील.