पाणी योजनेच्या दिरंगाईमुळे शहरास भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल: मजीप्राच्या अभियंत्यांनी खंडपीठात सादर अहवालात व्यक्त केली भीती

पाणी योजनेच्या दिरंगाईमुळे शहरास भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल: मजीप्राच्या अभियंत्यांनी खंडपीठात सादर अहवालात व्यक्त केली भीती


छत्रपती संभाजीनगर40 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सातारा परिसरातील टाकीचे काम अजूनही अर्धवट आहे.

  • ४ टाक्या हस्तांतरित केल्यानंतर चौथ्या दिवशी पाणी द्या : काेर्ट

महापालिका प्रशासनाकडून शहरात पुन्हा सातव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात अाहे. याची खंडपीठाने गंभीर दखल घेत प्रशासनाकडे विचारणा केली. मनपाने पाणी साठवणूक क्षमता वाढत नाही तोपर्यंत अशीच स्थिती राहील, असे उत्तर दिले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठी दिरंगाई होत असल्याचा अहवाल खंडपीठात सादर केला.

Advertisement

धरणात पाणीपातळी वाढली नसल्याचा फायदा घेत कंत्राटदाराने काम वेळेत पूर्ण करावे. एकदा संधी हुकली तर शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल, अशी भीती मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांनी आपल्या अहवालाद्वारे व्यक्त केली. खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी चार उंच पाण्याच्या टाक्यांच्या हस्तातरणानंतर त्या परिसरात चाैथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.

Advertisement

सहा टाक्या जमिनीखाली

पाणीपुरवठा योजनेत ५३ उंच टाक्या तर सहा जमिनीखालील टाक्या उभ्या करावयाच्या आहेत. शहरात पाणीपुरवठ्यासाठी १९०० किमीची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. न्यायालयाचे मित्र म्हणून अॅड. सचिन देशमुख यांनी काम पाहिले. कंपनीच्या वतीने अॅड. आर. एन. धोर्डे, मजीप्राच्या वतीने राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.

Advertisement

सध्या चाैथ्या दिवशी पाणी देणे अशक्य
मनपाच्या वतीने अॅड. संभाजी टोपे यांनी चार उंच पाण्याच्या टाक्या हस्तांतरित करण्याचे वेळापत्रक सादर केले. पाण्याची साठवणूक क्षमता वाढलेली नसल्याने पाणी चौथ्या दिवशी देणे अशक्य असल्याचे सांगितले. हनुमान टेकडी येथील जमिनीखालील पाण्याची टाकी ३१ ऑगस्ट, टीव्ही सेंटर ३१ ऑगस्ट, हिमायतबाग ३० सप्टेंबर आणि दिल्ली गेट येथील टाकी ३१ ऑक्टोबरला मनपाकडे हस्तांतरित केली जाईल.

मशीन कमीच

Advertisement

वेळेत खोदकामासाठी मशीनची संख्या वाढलेली नाही. प्रत्यक्ष साइटवर ९.१ किमी काम होणे अपेक्षित असताना केवळ ०.६ किमी इतकेच झाले आहे.

अजूनही अनेक कामे संथ गतीने सुरू

Advertisement
  • शहराच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसंबंधी दाखल जनहित याचिका मंगळवारी (२२ ऑगस्ट) सुनावणीस निघाली. मजीप्राच्या वतीने कामात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असल्याचा अहवाल खंडपीठात सादर केला.
  • प्रत्यक्ष कामावर कामगार कमी आहेत. १८५ फुटिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ ८७ झाले. साइटवर शटरिंग मटेरियल उपलब्ध नाही.
  • जोडपुलात दुरुस्ती सुचवलेली असताना एक महिना उलटला तरी कंत्राटदाराने हे काम केले नाही. पूर्वेकडे क्रॉफर डॅमची उंची वाढवण्याच्या सूचनांचे पालन केले नाही.
  • जॅकवेलच्या कामासाठी सातऐवजी तीन मशीन कार्यरत आहेत. क्रॉफर डॅमचे काम १३९ दिवसांत करण्याचे निश्चित केले होते. परंतु ४४ दिवस उशिराने काम होणार असल्याचे स्पष्ट झाले.Source link

Advertisement