पाणी पेटले: 69 गाव पाणी योजनेच्या स्थगितीविरूद्ध‎ ग्रामस्थ रस्त्यावर; भाजपला धरले धारेवर‎


अकाेला‎30 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील‎ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या ६९ गाव प्रादेशिक‎ पाणीपुरवठा याेजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून‎ स्थगिती दिल्याच्या विराेधात मंगळवारी ग्रामस्थांनी‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन केले.‎ पाण्यासाठी पायपीट कराव्या लागणाऱ्या महिलांनीही‎ आंदाेलनात सहभाग नाेंदवला.‎ हे आंदाेलन या याेजनेसाठी आग्रही असलेल्या‎ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) नेतृत्वात करण्यात आले.‎ या आंदाेलनात ६९ गावांमधील दाेन हजारांवर ग्रामस्थ‎ सहभागी झाले हाेते.

Advertisement

या वेळी नेते व ग्रामस्थांनी भाजपवर‎ टीका करत आगामी िनवडणुकीत धडा शिकवण्याचा‎ इशाराच िदला. दरम्यान या आंदाेलनामुळे‎ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गर्दी-मंडपामुळे‎ वाहतुकीची काेंडी झाली हाेती.‎ तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात बाळापूर‎ तालुक्यातील ५३ गावे व अकोला तालुक्यातील १६ गावे‎ अशा एकूण ६९ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना‎ मंजूर केली. मात्र काही िदवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतरही त्यांनी‎ याेजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिल्याने धरणे‎ आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात शिवसेनेचे‎ सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, माजी आमदार‎ गजानन दाळू , जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, अतुल‎ पवनीकर, िवकास पागृत, राहुल कराळे, राजेश मिश्रा,‎ दिलीप बाेचे, अनिरुद्ध देशमुख, उमेशआप्पा भुसारी,‎ उपस्थित होते.

असे केले आंदाेलन‎
आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर‎ िशवसेनेने ६९ गावांत बैठका घेतल्या‎ हाेत्या. त्यामुळे ग्रामस्थांची संख्या‎ लक्षात घेता आंदाेलनासाठी ४ हजार‎ चाैरस फुटाचा मंडप टाकला हाेता.‎ जिल्हाधिकारी कार्यालय ते‎ सरकारी बगीच्याकडे जाणारा व‎ दाेन्ही मुख्यद्वारामधील एक मार्ग‎ वाहतुकीसाठी बंद केला हाेता. याच‎ मार्गावर मंडप टाकलेले हाेते.‎ आंदाेलनात सहभागी ग्रामस्थांनी‎ याेजनेला स्थगिती दिल्याने‎ सरकारविराेधात घाेषणा दिल्या.‎ आंदाेलकांसाठी चहा-फराळ,‎ पाण्याची व्यवस्था करण्यात आली.‎ आंदाेलनानंतर शिवसैनिकांनी‎ िजल्हाधिकारी कार्यालयसमाेर‎ स्वच्छता अभियानही राबवले.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement