आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स खूप वाईट वेळ आले आहे. आयपीएलचा अर्धा हंगाम संपत आला तरी पण मुंबईचा वाईटकाळ काही जात नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ८सामने खेळले आहे. सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई संघाला जोरदार ट्रोल केले जात आहे. दरम्यान चाहत्यांना पाकिस्तान सुपर लीग मधील कराची किंग्जची आठवण झाली. कराची किंग्जचा कर्णधार बाबर आझम होता. चाहत्यांनी मुंबईची तुलना कराची टीमशी केले जात आहे, आणि दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
कराची किंग्जने पाकिस्तान सुपर लीग २०२२ हंगामातील पहिले ८ सामने गमावले होते. बाबरच्या नेतृत्वाखालील संघानला 9व्या सामन्यात जिंकता आला. बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट संघाचा देखील कर्णधार आहे. आणि भारतीय संघाचा रोहित शर्मा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई संघानेही पहिले ८ सामने गमावले आहे. अशा वेळेस चाहत्यांनी या दोन्ही संघांना जोरदार ट्रोल करत आहे.
पीएसएलचा अंतिम सामना २७ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये खेळला गेला आहे. यामध्ये लाहौर कलंदर्सने मुल्तान सुल्तानला हरवून विजेतेपद पटकावले आहे. लाहौरचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे होते. मुल्तान संघाचा कर्णधार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान होता. दुसरीकडे आयपीएलच्या १५व्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात झाली. आयपीएलचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे.
मुंबईचा संघ रविवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला, त्यात ३६ धावांनी पराभव सामना करायला लागला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने ६ गडी बाद १६८ धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने ६२ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ ८ बाद १३२ धावाच करू शकला. कर्णधार रोहित शर्माने ३९ आणि तिलक वर्माने ३८ धावा केल्या.