पाकिस्तानच्या शोएब मलिकचा नवा अवतार; पत्नी सानियासह मेहुणीनं केली ‘अशी’ कमेंट!पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर रॅपर लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो रॉकस्टारसारखा दिसत आहे. त्याच्या या फोटोवर त्याची पत्नी आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि मेहुणी अनम मिर्झा यांनी कमेंट केली आहे.

Advertisement

शोएब मलिकने त्याच्या या फोटोसोबत एक खास कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले, ‘द झल्मी रॅपर.’ लवकरच २७ जानेवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) सुरू होणार आहे. शोएब मलिक पेशावर झल्मी संघाचा एक भाग आहे. त्याने त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये हॅशटॅगसह त्याच्या टीमचे नावही लिहिले आहे.

सानिया मिर्झा आणि सानियाची बहीण अनम मिर्झा यांनी शोएबच्या या फोटोवर कमेंट करत मजा घेतली आहे. सानियाने लिहिले, ”जराही महागडे नाही (Not Bling At All).” तर अनमने कमेंटमध्ये या फोटोवर हसणारा इमोजी पोस्ट केला आहे.

Advertisement

या फोटोत शोएब मलिक रॉकस्टार आणि रॅपरपेक्षा कमी दिसत नाहीये. त्याने पिवळ्या रंगाचा डिझायनर टी-शर्ट आणि जॅकेट घातले आहे. याशिवाय त्याने घड्याळ, ब्रेसलेट, अंगठी, गळ्यात चेन आणि हातात अनेक दागिने घातलेले दिसतात. त्याने डाव्या हाताच्या बोटात BOSS अशी अक्षरे असलेली अंगठीही घातली आहे.

हेही वाचा – VIDEO : रोनाल्डोला भेटण्यापूर्वी गोदामात राहायची त्याची गर्लफ्रेंड; काम करण्यासाठी प्रति तास मिळायचे ‘इतके’ पैसे!

शोएब मलिक नुकताच टी-२० विश्वचषकानंतर बांगलादेशच्या दौऱ्यावर राष्ट्रीय संघाकडून खेळताना दिसला. तो विशेष काही करू शकले नाहीत. यानंतर, त्याने लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्स संघासाठी महत्त्वपूर्ण अष्टपैलू कामगिरी केली. त्याचा संघही चॅम्पियन ठरला.

Advertisement

शोएब मलिकने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ३५ कसोटी, २८७ वनडे आणि १२४ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १८९८ कसोटी धावा, ७५३४ एकदिवसीय धावा आणि २४३५ कसोटी धावा आहेत. याशिवाय त्याने ३२ कसोटी, १५८ एकदिवसीय आणि २८ टी-२० विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. आयपीएलमध्येही तो २००८ मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून ७ सामने खेळला आहे.

The post पाकिस्तानच्या शोएब मलिकचा नवा अवतार; पत्नी सानियासह मेहुणीनं केली ‘अशी’ कमेंट! appeared first on Loksatta.

Advertisement

Source link

Advertisement