पाकळ्या मिटून घेण्याचे हे नवे ऑपरेशन कमळ म्हणावे का?: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा भाजप नेत्यांना चिमटा


मुंबई20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पाकळ्या मिटून घेण्याचे हे नवे ऑपरेशन कमळ म्हणावे का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना डिवचले आहे.

Advertisement

भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार उभा केला नाही, तर दुसरीकडे कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्यासाठी माघार घेतली. त्यामुळे या निवडणुकीत नवीन ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळाले. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही, असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. सर्व रिपोर्ट हायकमांडला पाठवले आहेत. त्यावर आज हायकमांडकडून निर्देश येतील. त्याप्रमाणे कारवाई करू, पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. आम्ही पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. त्यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे.

Advertisement

सुधीर तांबे यांनी आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरला. त्यानंतर भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे सांगितले. ही एक प्रकारे काँग्रेससोबत धोकादडी आहे. हे सारे हायकमांडला कळवले आहे. हायकमांडचा आज निर्णय येईल. त्यानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू. बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही.

पटोले म्हणाले, नाशिकमध्ये भाजपने फॉर्म भरलेला नाही. त्या भागातले पदवीधर लोक अडाणी नाहीत. त्यांनाही हे सारे कृत्य कळते. भाजपकडून भय दाखवून घरे फोडण्याची कामे सुरू झालेली आहेत. आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. मात्र, ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना घर फुटल्याचे दुःख कळेल, असा टोलाही त्यांनी हाणला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement