पांगराशिंदे येथे चोरट्यांचा धुमाकूळ: कुटुंबीय छतावर झोपायला गेले अन चोरट्यांनी साधली संधी; एकाच रात्रीत 3 घरे फोडली


हिंगोली31 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन घरे फोडून रोख रकमेसह हजारोंचा ऐवज पळविला असून दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला आहे. सर्वच कुटुंबीय गर्मीमुळे छतावर झोपण्यासाठी गेले होते त्याचा गैेरफायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. एक वर्षापुर्वीही अशाच प्रकारे चोरीची घटना घडली होती.

Advertisement

याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे बहुतांश कुटुंब गर्मी मुळे छतावर झोपण्यासाठी जातात. शुक्रवारी देखील रात्री जेवण करून गावकरी घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री गावात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी अशोक शिंदे यांच्या घराच्या चॅनलगेटचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.

दरवाजा तोडून आत प्रवेश

Advertisement

त्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केला.त्यानंतर कपाटातील सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम पळविली. त्यानंतर चोरट्यांनी कुंडलिक देवराव शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. शिंदे यांनी हळद विक्री करून ५० हजार रुपये आणले होते. सदर रक्कम चोरट्यांनी पळविली. त्यानंतर चोरट्यांनी संजय किशन शिंदे यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील 30 हजार रुपये व काही ऐवज पळविला.

चॅनल गेटचे कुलुप तोडले

Advertisement

चोरट्यांनी शाम शिंदे व इतर ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी शिंदे कुटुंबिय जागे झाल्यामुळे चोरटे पसार झाले. या घटनेमध्ये हजारो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. आज पहाटे तीन ठिकाणचे सदर कुटुंब जागे झाल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे तसेच चॅनल गेटचे कुलुप तोडलेले दिसले.

घटनेमुळे गावात खळबळ

Advertisement

त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले होते. तर घरातील रोख रक्कम व दागिने पळविल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. अवधुत शिंदे, आबाजी शिंदे यांच्यासह गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कुरुंदा पोलिसांना माहिती दिली आहे.Source link

Advertisement