पहिल्या पत्नीसोबत मिळून पतीने दुसरीचा केला खून: दोघांनी मारहाण करुन मृतदेह फेकला कालव्यात, परभणीतील धक्कादायक घटना

पहिल्या पत्नीसोबत मिळून पतीने दुसरीचा केला खून: दोघांनी मारहाण करुन मृतदेह फेकला कालव्यात, परभणीतील धक्कादायक घटना


परभणीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लग्न झालेले असतानाही दुसऱ्या महिलेशी लग्न करत तिच्यासोबतच घरोबा केला. मात्र, दोन वर्षांनंतरच दोघांमध्ये खटके उडू लागल्याने पतीने पहिल्या पत्नीसोबत मिळून दुसऱ्या पत्नीचा खून केल्याची घटना परभणीमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे पती व पहिल्या पत्नीने मिळून दुसरीला जबर मारहाण केली व नंतर तिला कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

Advertisement

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. शिल्पा नामदेव दुधाटे (रा. नेहरुनगर, परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, नामदेव दुधाटे आणि स्वाती दुधाटे असे आरोपी पती-पत्नीचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी कालव्यात आढळळा मृतदेह

Advertisement

परभणी शहरातील नांदखेडा रोड परिसरातील एका कालव्यामध्ये काही दिवसांपूर्वी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ​​​​​ महिलेचा खून करून तिचा मृतदेह कालव्यामध्ये फेकल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने मयत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. त्यानंतर मृतदेह हा परभणी शहरातील नेहरुनगर परिसरातील शिल्पा नामदेव दुधाटे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

पती दुसऱ्या महिलेसोबत आढळला

Advertisement

मृतदेह शिल्पा दुधाटे यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. तपासादरम्यान, दोन वर्षांपूर्वी शिल्पाचे लग्न लिमला येथील नामदेव दुधाटे यांच्याशी झाला असल्याचे समोर आले. तेव्हापासून शिल्पा आणि नामदेव दुधाटेसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी नामदेव दुधाटेचा शोध सुरु केला. मात्र, नामदेव दुधाटे हा आपल्या मूळगावी लिमला येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या लिमला येथील घरात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना तिथे एका महिलेसह नामदेव दुधाटे पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे नामदेव दुधाटे, स्वाती दुधाटे असल्याचे सांगितले.

पोलिसी खाक्या दाखवताच पतीची कबुली

Advertisement

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नामदेव व स्वाती दुधाटे यांची अधिक चौकशी केल्यानंतर हे दोघेही पती-पत्नी असल्याे पोलिसांना समजले. त्यामुले पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी यावेळी दोघांकडे मयत शिल्पा दुधाटे बद्दल चौकशी केली. मात्र, नामदेव दुधाटे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्यानंतर दोन वर्षापूर्वी शिल्पासोबत लग्न झाले असल्याचे त्याने सांगितले.

मृत्यू झाल्याचे समजून कालव्यात फेकले

Advertisement

पती नामदेव दुधाटेने पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी शिल्पा यांच्याशी लग्न झाल्यानंतर दोघेही शहरातील नेहरुनगर येथे राहत होते. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचे घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यातून आरोपी नामदेव दुधाटे आणि त्यांची पहिली पत्नी स्वाती दुधाटे यांनी मिळून शिल्पाला मारहाण केली. तसेच शिल्पा मेल्याची समजून कालव्यात फेकून दिले. खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी नामदेव व स्वाती दुधाटेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.Source link

Advertisement