पहिलीपासूनच्या शाळा सुरू: 1 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार! राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय


 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Schools Reopen | Marathi News | Maharashtra School Reopen | Maharashtra Cabinet Approves Reopening All Schools From Class 1 To Class 10 With Covid19 Norms

Advertisement

मुंबई31 मिनिटांपूर्वी

 • कॉपी लिंक

राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी हिरवा कंदिल दिला. पालकांच्या संमतीने राज्यात खासगी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता महापालिका आणि सर्व सरकारी शाळा देखील सुरू होणार आहेत. शाळा सुरू होत असल्या तरीही कोरोना नियमावलींचे विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी आता शिक्षकांवर राहील.

Advertisement

देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा वेग मंदावत असताना शाळा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले. परंतु, आतापर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन क्लासची परवानगी होती.

आता मात्र, कोरोना मंदावला असताना पहिल्या वर्गापासूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, आता 1 डिसेंबरपासून पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्वच वर्गांच्या शाळा सुरू होत आहेत. मंत्रिमंडळाच्या आरोग्य विभागासह चाईल्ड टास्क फोर्सने सुद्धा शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला आधीच मान्यता दिली आहे.

Advertisement

मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमध्ये नेमके काय म्हटले?

 1. शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
 2. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
 3. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
 4. कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
 5. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.
 6. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
 7. संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

कोरोनाचा वेग मंदावला असला तरीही गाफील राहू नका
दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असली तरीही ती सौम्य राहील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले. यासोबतच, कोरोना रुग्णांचा वेग मंदावला असला तरीही गाफील राहू नका. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असा सल्ला देखील आरोग्य मंत्र्यांनी दिला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here