पश्चिम विदर्भात जानेवारीस अखेरीसही 69.60 टक्के जलसाठा: उन्हाळ्यातही विविध पाणी पुरवठा योजनांना मिळेल पाणी


अकोला23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भात यावेळी जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरली होती. त्यामुळेच जानेवारी अखेरीसही पश्चिम विदर्भात साठवण क्षमतेच्या 69.60 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यात विविध पाणी पुरवठा योजनांना पाणी मिळणार आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेने यावेळी जानेवारी महिन्यात 4.18 टक्के जलसाठा कमी आहे.

Advertisement

पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम, अमरावती जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम, यवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम, बुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम तर वाशीम जिल्ह्यात एकही मोेठा प्रकल्प नाही. मात्र तीन मध्यम प्रकल्प आहेत. याच बरोबर या पाचही जिल्ह्यात एकूण 246 लघु प्रकल्प आहेत. यामुळे 3076.38 दशलक्ष घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली आहे. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे 95 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे पश्चिम विदर्भातील हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आली. त्याच बरोबर विविध पाणी पुरवठा योजनांना मुबलक जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीसही मुबलक जलसाठा उपलब्ध आहे.

प्रकल्प निहाय जलसाठा

Advertisement

9 मोठे प्रकल्प – 997.69 दलघमी – 71.27 टक्के

27 मध्यम प्रकल्प – 549.03 दलघमी – 71.77 टक्के

Advertisement

246 लपा प्रकल्प – 594.53 दलघमी – 65.23 टक्के

मागील वर्षीच्या तुलनेने 4.18 टक्के कमी जलसाठा

Advertisement

मागील वर्षी पश्चिम विदर्भात जानेवारी अखेरीस 2269.60 दशलक्ष घनमिटर (73.78 टक्के) जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेने 4.18 टक्के जलसाठा यावर्षी कमी आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement