पवित्रा: गुंठेवारी नियमानुकुल शुल्कात केलेली वाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन केले जाईल, शिवसेना ठाकरे गटाचा इशारा

पवित्रा: गुंठेवारी नियमानुकुल शुल्कात केलेली वाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन केले जाईल, शिवसेना ठाकरे गटाचा इशारा


अकोला12 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमानुकुल करताना प्लॉट खरेदीच्या एकूण रकमेच्या दहा टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय प्रशासनाने मागे न घेतल्यास शिवसेना (ठाकरे गट)च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट)चे अकोला पश्चिमचे अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी दिला आहे. विशेष म्हणजे गुंठेवारी नियमानुकुल करताना केलेली दहा टक्के वाढ ही आर्थिकदृष्य्या दुर्बल घटकातील नागरिकांना परवडणारी नाही, ही बातमी दिव्य मराठीने स‌र्वात आधी प्रसिद्ध करुन या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या नादात आर्थिकदृष्य्या दुबर्ल घटकातील नागरिकांना त्रास होवू नये, याची खबरदारी न घेता, महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमानुकुल करताना रेडीरेक्नरच्या दरानुसार येणाऱ्या किमतीच्या दहा टक्के रक्कम घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतानाच गुंठेवारीचे नियमानुकुल करताना नियमानुसार नऊ मिटरचा रस्ता सोडणेही प्रशासनाने प्रस्ताव मंजुर केला. या निर्णयामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थी अडचणीत आले.

प्रशासनाने घेतलेल्या या निर्णया नंतर दिव्य मराठीने या विषयाला वाचा फोडली. त्यानंतर राजकीय पक्ष खडबडून जागे झाले. शिवसेना (ठाकरे गट)चे अकोला पश्चिम प्रमुख राजेश मिश्रा यांनी या विरोधात मोर्चा उघडला असून प्रशासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या बाबत कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप या विषयाबाबत अद्याप काहीही बोलायला तयार नसल्याने या विरोधाचे पूर्ण क्रेडीट हे राजेश मिश्रा यांना दिले जाणार आहे. दरम्यान गुंठेवारीचे नियमानुकुल करताना लावलेली दहा टक्के रक्कम तसेच लिज पट्टे देताना नऊ मिटरची लावलेली अट जर प्रशासनाने मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राजेश मिश्रा यांनी दिला आहे.

AdvertisementSource link

Advertisement