पवारांना सवाल: शरद पवारांकडून भावना गवळींच्या समर्थनानंतर किरीट सोमय्यांचा पवरांना सवाल; भावना गवळींची 100 कोटीची चौकशी होणार, सोमय्यांचा दावा


Advertisement

28 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

शरद पवारांनी भावना गवळींचे समर्थन केल्यानंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता पवारांनाच सवाल केला आहे. शरद पवार यांनी भावना गवळींना विचारावं की, कपाटातून जे 7 कोटी चोरीला गेले ते कुठून आले होते? असं सोमय्या यांनी म्हटले आहे.

Advertisement

भावना गवळी यांचा शरद पवार बचाव करत आहेत. पवार यांनी गवळींना विचारावं की, कपाटातून 7 कोटी चोरी गेले ते कुठून आले होते? 44 कोटी रुपये केंद्र सरकारचे आणि 11 कोटी रुपये स्टेट बँक ऑफ इंडियाचे, असा 55 कोटीचा कारखाना त्यांनी बुडवला. तो कारखाना 25 लाखात भावना गवळी कंपनीने विकत घेतला. शरद पवार यांनी याची चौकशी केली का? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. तसंच भावना गवळी यांची 100 कोटीची चौकशी होणार, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी ईडीच्या गैरवापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचं सांगताना, महाराष्ट्रात यापूर्वी ईडीच्या इतक्या केसेस कधी ऐकल्या होत्या का, असा सवाल शरद पवारांनी केला होता. वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचं उदाहरण त्यांनी दिले होते. ‘भावना गवळी यांच्या तीन शिक्षण संस्था आहेत. एक कंपनी आहे. या संस्थांचा व्यवहार २० ते २५ कोटींच्या घरात आहे. त्यांना ईडी त्रास देत आहे. ‘जिथं कुठं गैरव्यवहार झाला असेल, तिथं तपास करण्यासाठी धर्मादाय आयुक्त असतात. शाळा, कॉलेजचे आर्थिक व्यवहार त्यांच्या अखत्यारीत असतात. राज्य सरकारचं गृहखातं आहे. आपल्याकडे खोलात जाऊन चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या संस्था असताना प्रत्येक ठिकाणी ईडी येऊन हस्तक्षेप करते, ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे,’ असे पवार म्हणाले होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here