परीक्षा: मेडिकलच्या सर्व शाखांच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलल्या; परीक्षा 31 जानेवारीऐवजी 28 फेब्रुवारीपासून


Advertisement

नाशिकएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या अाहेत. आता पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा जानेवारीऐवजी १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ३१ जानेवारीऐवजी २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.

Advertisement

राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास रुग्णसेवेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न कॉलेजांतील वैद्यकीय शिक्षक व विद्यार्थ्यांची गरज भासू शकते. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement