पराभवानंतर राहुल गांधींनी राजीनामा न देता सत्ताधाऱ्यांचा सामना करायला हवा: रिपाइच्या छोट्या गटांनी आमच्या पक्षात यावे- आठवले

पराभवानंतर राहुल गांधींनी राजीनामा न देता सत्ताधाऱ्यांचा सामना करायला हवा: रिपाइच्या छोट्या गटांनी आमच्या पक्षात यावे- आठवले


मुंबई35 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि रिपाइ यांच्या महायुतीची सरकार सत्तेवर आहे. आता अजित पवारही सरकारमध्ये आले. त्यांचे स्वागत आहे, परंतु आता महायुतीत नवीन पक्षांना प्रवेश नको. आम्हाला मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले. डॉ. राजेंद्र गवई हे सोबत आल्यास त्यांचे स्वागत करू, असेही ते म्हणाले.

Advertisement

दरम्यान रामदास आठवले म्हणाले की, विरोधी पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने आरोप होत आहेत. पराभवानंतर राहुल गांधींनी राजीनामा न देता सत्ताधाऱ्यांचा सामना करायला हवा होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधी पक्षांकडून चुकीच्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ नाव दिले. ते योग्य नाही. एका कार्यक्रमानिमित्त (ता. 28) नागपुरात आले असता रविभवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

350 जागांवर विजयी होणार

Advertisement

रामदास आठवले म्हणाले की, विरोधकांनी कितीही आघाडी केली तरी 2024 च्या निवडणुकीतही पुन्हा मोदीच येतील. 350 पेक्षा अधिक जागा एनडीएला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिपाइच्या इतर छोट्या गटांना आपल्या पक्षात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.

मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा

Advertisement

रामदास आठवले म्हणाले की, सुलेखा कुंभारे आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले. दलित मुलांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात गृहमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असून पीडितांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भूपेश थूलकर, पूरण मेश्राम, राजन वाघमारे, बाळू घरडे, विनोद थूल उपस्थित होते.

मागणी करणाऱ्यावर कारवाई करा

Advertisement

रामदास आठवले म्हणाले की, संविधान कुणीही बदलू शकत नाही. त्यात दुरुस्ती करू शकतो, तशी तरतूदच संविधानात आहे. संविधान विरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई हवी. यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.Source link

Advertisement