परदेशी नागरिकांकडून 12 लाखांचे अमली पदार्थ जप्त: पुण्यात हडपसर परिसरात दोघांना अटक

परदेशी नागरिकांकडून 12 लाखांचे अमली पदार्थ जप्त: पुण्यात हडपसर परिसरात दोघांना अटक


पुणे11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील हडपसर परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन परदेशी इसमना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा इडुलस खत असे 11 लाख 88 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

याप्रकरणी फिलिप विलिवन इडिली (वय -49, सध्या रा. ऊरळी देवाची, हडपसर- सासवड रस्ता) आणि त्याच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. आरोपी इडिली मूळचा नायजेरियाचा आहे. तो आणि त्याची मैत्रिण ऊरळी देवाची परिसरातील एका सोसायटीत राहण्यास आहेत. दोघेजण अमली पदार्थांची विक्री विविध भागात करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी प्रवीण उत्तेकर आणि पांडुरंग पवार यांना मिळाली होती.

त्यानुसार माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले आले. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा ईडुलस खत असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाउल, पारपत्र जप्त करण्यात आलेले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोज साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

व्याजाचे पैसे न दिल्याने दुचाकी घेतली काढून

व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दुचाकी काढून घेत व्याज दिल्यावरच दुचाकी घेऊन जा अशी धमकी देणार्‍या तिघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

अजयसिंग दुधानी, निहालसिंग टाक आण बच्चनसिंग भोंड या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल आवताडे (28, रा. मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Advertisement