परतवाड्यात एलसीबीने पकडले दोन देशी कट्टे: 4 जिवंत काडतूसांसह दोघांना अटक; व्यवहार सुरू असतानाच टाकली पोलिसांनी धाड


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • LCB Seizes Two Indigenous Kattas In Amravati Return, Arrests Two With Four Live Cartridges; The Police Raided When The Illegal Katta Sale Was Going On

अमरावती15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

परतवाडा शहरातील एका हॉटेलमागे एक व्यक्ती असून त्याच्याकडे अवैध देशी कट्टा असल्याची माहीती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे पथकाने शुक्रवारी (दि. 20) त्या परिसरात धाड टाकली असता दोन संशयित पोलिसांना दिसले. त्या दोघांजवळ प्रत्येकी एक याप्रमाणे दोन अवैध देशी कट्टे व चार जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी दोघांनाही पकडले आहे.

Advertisement

शुभम ऊर्फ शेराभाई कुंजीलाल सेंगर (ठाकूर) (28, रा. पेंशनपुुरा, परतवाडा) आणि दिपक ऊर्फ दिप्याभाई राममनोहर यादव (37, रा. देवीनगर, लोहारा, यवतमाळ) यांना अटक केली आहे. एलसीबीचे एपीआय रामेश्वर धोंडगे त्यांच्या पथकासह परतवाडा भागात गस्तीवर होते. त्याचदरम्यान त्यांना माहिती मिळाली की, आठवडी बाजार परिसरातील हॉटेल सुर्यकमलमागे असलेल्या मैदानात शेराभाई ठाकूर हा अवैध देशी कट्टा घेवून आला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथक पोहचले.

त्यावेळी पल्सर दुचाकीसह शेरा ठाकूर दिसला. याचवेळी त्याच्यासोबत एक व्यक्ती अजून होता. पोलिसांना त्यालाही ताब्यात घेतले. त्या दोघांकडेही एक एक देशी कट्टा ते सुद्धज्ञ ‘लोड’ स्थितीत आणि दोन जिंवत काडतूस मिळून आले. दुसऱ्याचे नाव दिप्याभाई यादव असे असून तो ठाकूरकडून देशी कट्टा खरेदी करण्यासाठी यवतमाळवरुन परतवाड्याला आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Advertisement

त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक करुन परतवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. परतवाडा पोलिसांनी या दोघांविरुध्द अवैध अग्नीशस्त्र बाळगणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन देशी कट्टे, चार जीवंत काडतूस, एक दुचाकी व स्मार्ट फोन असा एकूण 1 लाख 37 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई एलसीबीचे पीआय तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धोंगडे, दिपक उईके, युवराज मानमोठे, रविन्द्र वऱ्हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, कमलेश पाचपोर यांनी केली आहे.

दोघेही सराईत गुन्हेगार

Advertisement

एलसीबीने पकडलेले शेरा ठाकूर व दिपक यादव हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द यापुर्वी विवीध जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहीती पोलिस तपासात समोर आली आहे. शेरा ठाकूरने हे कट्टे कुठून आणले, यापुर्वी त्याने कट्टे विक्री केली आहे का? यासह अन्य माहीती पोलिस घेत आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement