अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिक्षक आघाडी म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघाचे संस्थापक प्रा. डॉ. प्रफुल्ल राऊत हे विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मला पक्षाचा पाठिंबा नसला तरीही माझी उमेदवारी कायम असल्याचे मत त्यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. प्रा. डॉ. राऊत यांच्यामते त्यांनी स्वत:च सदर संघटनेची बांधणी केली आहे. मुळात या संघटनेचे बहुतेक सदस्य हे पदवीधर असल्याने त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी पक्षाकडे आग्रह धरला होता.
दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:च उमेदवारी दाखल करुन पक्षाचा पाठिंबा मागितला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने राकाँने आपल्याला पाठिंबा दिला नाही. परंतु तरीही संघटनेतील सर्व सदस्यांच्या बळावर आपण शेवटपर्यंत निवडणूक मैदानात राहू, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यामते अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात संघटनेचे २७ हजाराहून अधिक सदस्य असून ते त्यांचा प्रचार करणार आहेत. पत्रकार परिषदेला संघटनेचे महासचिव प्रा. डॉ. दिलीप सूर्यवंशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.