पत्नीचा मृत्यू तर पतीवर उपचार‎: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याचा‎ सहा महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह‎


अमरावती‎44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चार दिवसांपूर्वी विष घेऊन‎ इर्विनमध्ये पोहोचलेल्या‎ दाम्पत्यापैकी पत्नीचा त्याच दिवशी‎ मृत्यू झाला होता. तर पतीवर‎ अजूनही उपचार सुरू आहेत.‎ दरम्यान सहा महिन्यांपूर्वीच या‎ दाम्पत्याने प्रेमविवाह केला‎ असल्याचे कोतवाली पोलिसांनी‎ सांगितले आहे.‎ हेमलता प्रणय धुर्माळे (२४)‎ असे मृत महिलेचे तर प्रणय‎ साहेबराव धुर्माळे (२६, दोघेही रा.‎ चिखलसावंगी) असे विष‎ घेतल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या‎ व्यक्तीचे नाव आहे.

Advertisement

गुरुवारी (दि.‎ १२) सायंकाळी सहा वाजेच्या‎ सुमारास हेमलता आणि प्रणय‎ दोघेही इर्विनमध्ये पोहोचले होते.‎ त्यावेळी प्रणयची प्रकृती अत्यवस्थ‎ होती. त्यावेळी हेमलता यांनी पती‎ प्रणयला दाखल केले व स्वत: बाहेर‎ निघून गेली. काही वेळानंतर‎ हेमलता अत्यवस्थ स्थितीत‎ रुग्णालय परिसरातच आढळली‎ होती. उपचारादरम्यान गुरुवारी‎ सायंकाळीच त्यांचा झाला होता.‎ हेमलता आणि प्रणय यांची काही‎ महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या‎ माध्यमातून ओळख झाली होती.‎ त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले व त्यांनी‎ लग्नाचा निर्णय घेतला. त्यांनी‎ परस्परच विवाह केला होता.‎

लग्नानंतर काही दिवस ते घरीसुद्धा‎ गेले नव्हते मात्र दिवाळीच्या काळात‎ ते प्रणयच्या घरी चिखलसावंगीला‎ गेले होते. पण चिखल सावंगी वरुन‎ पुन्हा दोघेही अमरावतीत राहायला‎ आले. मात्र अमरावतीत कुठे‎ राहायचे, प्रणय काय काम करतो,‎ याबाबत मात्र त्याच्या कुटुंबीयांना‎ अजूनही माहिती नसल्याचे‎ पोलिसांनी सांगितले.‎ दरम्यान, १२ जानेवारीला‎ सायंकाळी या दोघांनी कीटकनाशक‎ आणले व रेल्वे स्टेशन चौकात‎ प्राशन केले. त्यानंतर त्यांनी स्वत:च‎ गंभीर स्थितीत ऑटोने इर्विन गाठले‎ होते. दरम्यान कोतवाली पोलिसांनी‎ प्रणयला याबाबत विचारपूस‎ करण्याचा प्रयत्न केला, मात्र‎ आर्थिक चणचण होती, काम‎ मिळत नव्हते, असे सांगतो आहे,‎ मात्र त्याचा सविस्तर जबाब उपचार‎ सुरू असल्यामुळे झाला नसल्याचे‎ कोतवाली पोलिसांनी सांगितले.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement