अश्वप्रेमी रसिका रेड्डी यांचा अश्वांवरील निव्र्याज प्रेम दर्शविणारा अतिशय हृदयस्पर्शी आणि माधुरी ताम्हणे यांनी सुंदर रीतीने शब्दबद्ध केलेला लेख (३० एप्रिल) वाचला आणि सकाळ अतिशय आनंददायी झाली. हा आनंद दिल्याबद्दल लोकसत्ता व लेखिकेचे खरोखर मनापासून आभार. दर शनिवारची सकाळ ‘सोयरे सहचर’ हे साप्ताहिक सदर वाचून आनंदित होतेच, मात्र हा लेख मनाला चिटकला! एक तर रसिका रेड्डींचा हेवा वाटतो. माणसाच्या मनाला जे आवडते ते संपूर्ण आयुष्यभर करायला मिळणे यापेक्षा आणखी काय हवे आयुष्यात आणि त्यातही जोडीदारसुद्धा त्याच क्षेत्रातील मिळणे हे भाग्यच! आमच्या घरीही एक मांजर पाळलेली आहे जिच्या येण्याने आमचे आयुष्य निव्र्याज, निष्पाप प्रेमाने भरून निघत आहे. हा शब्दातीत अनुभव आहे. असेच अनुभवसंपन्न प्राणीप्रेमींचे लेख दर शनिवारी अव्याहतपणे वाचायला मिळो आणि आमचे आयुष्य ते वाचून तृप्त होवो ही कामना.-आशीष सिरसोकर