पठाण चित्रपटाच्या सादरीकरणाला नगरमध्ये विरोध: दोन्ही चित्रपट गृहाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निदर्शनेअहमदनगर41 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नगर शहरात चित्रपट गृहांमध्ये पठाण चित्रपटाचे प्रसारण सुरू असताना बुधवारी सायंकाळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहाबाहेर घोषणाबाजी करत निदर्शने केली. शहरातील नव्याने सुरू झालेल्या कॉनप्लेक्स व आशा या दोन चित्रपट गृहासमोर आंदोलने करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना अडवत चित्रपट गृहात प्रवेश नाकारला. दोन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

बुधवारी नगर शहरातील कॉनप्लेक्स व आशा या दोन चित्रपट गृहात पठाण चित्रपट रिलीज झाला आहे. दोन्ही चित्रपटगृहांमध्ये हाउसफुल गर्दीत चित्रपटाचे प्रसारण सुरू आहे. सायंकाळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर संयोजक कुणाला भंडारी यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही चित्रपटगृहांवर मोर्चा काढला. दोन्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आंदोलन पोहोचण्यापूर्वीच दोन्ही चित्रपट गृहाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नव्या चित्रपट गृहाबाहेर पहिलेच आंदोलन

Advertisement

सावेडी उपनगरातील नव्याने सुरू झालेल्या कोहिनूर मॉल मधील कॉनप्लेक्स चित्रपट गृहाबाहेर आंदोलकांनी जय श्रीराम व शाहरुख खान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना प्रवेशद्वारावर रोखून परत पाठवले.

आशा चित्रपटगृहाकडे वळवला मोर्चा

Advertisement

त्यानंतर आंदोलकांनी मध्य शहरातील आशा चित्रपट गृहाकडे मोर्चा वळवला. तेथेही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व आंदोलकांना परत पाठवले. दरम्यान, शहरातील दोन्ही चित्रपट गृहामध्ये पठाण चित्रपटातील शो सुरळीतपणे सुरू आहेत.

बजरंग दलाने दिले होते निवेदन

Advertisement

दोन दिवसांपूर्वीच बजरंग दलाच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन पठाण चित्रपटाचे सादरीकरण रोखण्याची मागणी केली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत चित्रपट गृहाबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. काही चित्रपट गृहाच्या व्यवस्थापनाने गोंधळ होण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून रीतसर पोलिस बंदोबस्त घेतला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement