पक्षसंघटन: पहिल्या टप्प्यात जूनमध्ये 6 जिल्ह्यांत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची निवडणूक, आ. खडसेंची माहिती


जळगावएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • डिजिटल सदस्य यादी तयार करण्याची सूचना

कोरोनामु‌ळे गेली दोन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. आता पहिल्या टप्प्यात सर्वाधिक क्रियाशील सदस्य नोंदणी व डिजिटल सदस्य यादी तयार झालेल्या धुळे ग्रामीण, बुलडाण्यातील जळगाव जामोदसह सहा जिल्ह्यांमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली.

Advertisement

सध्या ऑनलाइन सदस्य नोंदणी करण्यात येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये क्रियाशील सदस्य नोंदणी कमी आहे. त्या जिल्ह्यांना सदस्य नोंदणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदस्य वाढल्याशिवाय निवडणूक होणार नाही, असे बजावण्यात आले आहे. लवकरच नोंदणीचा पुन्हा आढावा घेऊन निवडणुका घेण्यात येतील. क्रियाशील सदस्यांमधून बूथ प्रमुख, तालुकाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांमधून जिल्हाध्यक्ष निवडण्यात येईल. या निवडणुकांसाठी निरीक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यांमध्येही निवडणुका घेण्यात येणार आहेत. खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीत महानगर जिल्हाध्यक्षपदही आहे. लोकसभानिहाय जिल्हाध्यक्ष निवडण्यात येतील. जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतर अल्पसंख्याक, महिला व इतर पदांसाठी निवडणूक घेण्यात येईल. असेही खडसे म्हणाले.



Source link

Advertisement