पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित रंगणार आयपीएल समारोपण सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित रंगणार आयपीएल समारोपण सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित रंगणार आयपीएल समारोपण सोहळा

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला सांयकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे. त्याअगोदर ६:३० वाजता या हंगामाचा समारोप समारंभ (क्लोजिंग सेरेमनी) होणार आहे. यामध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी सहभाग घेणार आहे.

हा समारोप समारंभ जवळपास ४५ मिनिटे चालू शकतो. याआधी २०१८च्या आयपीएल हंगामाचा समारोप समारंभ झाला होता. २०१९मध्ये पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांसाठी हा समारंभ टाळला होता. तर २०१९ नंतर कोरोनामुळे तो करता आला नाही. या हंगामात राजस्थान १४ वर्षानंतर दुसऱ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. ते २००८च्या आयपीएल हंगामाचे विजेते होते. राजस्थानचा जोस बटलर आणि गुजरातचा डेविड मिलर यांनी प्लेऑफच्या सामन्यांत उत्तम फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे.

Advertisement

यंदाच्या हंगामात या समारोपासाठी ऑस्कर विजेता संगीतकार एआर रहमान हे आपल्या संगीताची जादू सादर करणार आहे. तर अभिनेता रणवीर सिंग चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. या दोघांबरोबरच मोहित चौहान आणि बेनी द्याल हे पण आपली कला सादर करणार आहे. तसेच, या सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे पण स्टेडियमवर उपस्थित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (बीसीसीआय) भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त समारोप समारंभात कार्यक्रम आयोजित करणार असल्याचीही चर्चा आहे. सध्या भारतीय सरकार ‘आजादी का अमृत महोत्सव’ नावाने अनेक कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यानुसार बीसीसीआय देखील भारतीय क्रिकेटचा इतिहास आयपीएलच्या समारोप समारंभातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Advertisement

तसेच गुजरातने पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात बटलरच्या ८९ धावांच्या जोरावर राजस्थानने २० षटकात सहा विकेट्स गमावत १८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला शुबमन गिल आणि मॅथ्यू वेडने चांगली सुरूवात करून दिली होती. त्यांच्या विकेट्स गमावल्यावर मिलरने तूफानी नाबाद अर्धशतकीय खेळी केली. त्याने ३८ चेंडूत नाबाद ६८ धावा करत संघाचा अंतिम सामन्यातील प्रवेश करण्याचा मार्ग सुकर करून दिला. यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आणि दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने राजस्थान तर आयपीएलमध्ये पदार्पण करणारा गुजरात संघही जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे.

Advertisement