रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात गुरुवारी आयपीएल २०२२चा ६७ वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामान खेळला गेला. बेंगलोरसाठी प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. बेंगलोरने गोलंदाजी आणि फलंदाजीत दिमाखदार खेळ दाखवत ८ विकेट्स राखून हा महत्त्वपूर्ण सामना जिंकला. या सामना विजयासह बेंगलोरचे प्लेऑफमधील आव्हान कायम आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोर संघाला १८.४ षटकात गुजरातचे आव्हान गाठले आणि सामना खिशात घातला. विराट कोहलीने मोठ्या सामन्यात मोठी खेळी करत आरसीबीला मस्ट विन सामन्यात विजयी मार्गावर नेले. विराटच्या ७३ धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे १६९ धावांचे आव्हान ८ गडी राखून पार केले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. गुजरातकडून राशिदने दोन विकेट घेतल्या. तर फाफ ड्युप्लेसिसने ४४ धावांचे योगदान दिले. तर ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूत नाबाद ४० धावा चोपल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार ६२ धावा केल्या. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत १६ गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे.
गुजरातच्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७३ धावा फटकावल्या. पहिल्या चेंडूंपासूनच आक्रमक पवित्रा घेत विराटने ५४ चेंडूत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. तसेच त्याने कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारीही रचली. फाफनेही वैयक्तिक ४४ धावा जोडल्या. याखेरीज ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंमध्ये नाबाद ४० धावांची वादळी खेळी करत ८ चेंडू शिल्लक असतानाच संघाला सामना जिंकून दिला.
या डावात गुजरातच्या गोलंदाजांना विशेष प्रदर्शन करता आले नाही. केवळ एकटा फिरकीपटू राशिद खान बेंगलोरच्या २ विकेट्स घेऊ शकला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून हार्दिक पंड्याने कर्णधार खेळी केली. ४७ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ६२ धावा केल्या. तर डेविड मिलरने २५ चेंडूत ३४ धावा व सलामीवीर वृद्धिमान साहाने २२ चेंडूत ३१ धावा जोडल्या. याखेरीज राशिद खाननेही डावाअंती फलंदाजीला येत ६ चेंडूंमध्ये २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद १९ धावांची धुव्वादार खेळी केली.
या डावात बेंगलोरकडून जोश हेजलवुडने किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने आपल्या कोट्यातील ४ षटके फेकताना २ विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि वानिंदू हसरंगा यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले. दरम्यान, हार्दिकने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र त्याला साथ देण्याासाठी आलेला राहुल तेवतिया २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर आलेल्या राशिद खानने स्लॉग ऑव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत ६ चेंडूत १९ धावा चोपून गुजरातला १६८ धावांपर्यंत पोहचवले. दुसऱ्या बाजूला कर्णधार हार्दिक पांड्याने ४७ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली.