आयपीएलचा सामना पाहायला जाणार असाल तर त्यापूर्वी हा एक व्हिडीओ पाहायला हवा. कारण आयपीएलचा सामना पाहायला गेलेल्या एका बुजुर्ग व्यक्तीवर आघात झाल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदारने यावेळी दमदार षटकार लगावला आणि हा चेंडू थेट एका बुजुर्ग व्यक्कीच्या डोक्यावर आदळल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नेमकं घडलं तरी काय, पाहा व्हिडीओ…
आयपीएमध्ये अशी एक गोष्ट घडली की त्यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. कारण आयपीएलमधील एका षटकाराने बुजुर्ग चाहत्यांचं डोकं फुटून रक्त आल्याचं पाहायला मिळालं. पण नशिब चांगलं म्हणून त्यांचा जीव वाचल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यामध्ये ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार यावेळी फलंदाजी करत होता. ही गोष्ट ९व्या षटकात घडल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी पंजाबचा हरप्रीत ब्रार गोलंदाजी करत होता. या ९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रजतने जोरदार फटका लगावला आणि तो थेट सीमारेषे पार गेला. रजतने यावेळी १०२ मीटर लांब षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले. या षटकारानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. पण त्याचवेळी मैदानातील एक बुजुर्ग चाहते अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. कारण हा चेंडू थेट या बुजुर्ग व्यक्तीच्या डोक्यावर आदळल्याचे पाहायला मिळाले.
चेंडू लागल्यानंतर या व्यक्तीच्या शेजारी बसलेल्या महिलेने त्यांच्या डोक्यावर हात धरला आणि तेव्हा रक्तप्रवाह होत असल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीला या सामन्यात पत्करावा लागल्याचे पाहयला मिळाले. पंजाब किंग्सने आरसीबीवर यावेळी ५४ धावांनी विजय साकारला. या पराभवानंतर देखील बेंगळुरूचा संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे, पण त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अवघड झालाय. पंजाबच्या विजयाने प्लेऑफचे समीकरण आणखी क्लिष्ट झालय. आरसीबीविरुद्ध पंजाबचा पराभव झाला असता तर त्याचे आव्हान संपुष्टात आले असते. पण आता पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान कायम आहे.
आरसीबीकडे आता फक्त एकच मॅच शिल्लक आहे. १३ सामन्यात त्यांचे १४ गुण झाले आहे. बेंगळुरूची अखेरची लढत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर संघाचे टेन्शन वाढू शकते. कारण त्यांचे नेटरनरेट वजा ०.३२३ इतके आहे आणि विजय मिळाला तर प्लेऑफमध्ये जाण्याची संधी अधिक असेल. सध्याच्या घडीला आयपीएलमधील तीन संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण अजूनही सात संघ आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात.