पंच अल्लाउद्दीन पालेकर यांची १५ वर्षांनी स्वप्नपूर्तीभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय वंशाचे अल्लाउद्दीन पालेकर मुख्य पंचांची भूमिका बजावत आहेत. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पालेकर यांना प्रथमच कसोटी सामन्यात पंचगिरी करण्याची संधी मिळाली.

Advertisement

पालेकर आफ्रिकेचे ५७वे आणि विश्वातील ४९७वे पंच आहेत. मरायस इरास्मस यांना गुरू मानणारे पालेकर आज त्यांच्याच साथीने पंचगिरी करत आहेत. त्यांचे वडील आणि काकासुद्धा पंच असून रत्नागिरीत खेड तालुक्यात पालेकर यांचे गाव आहे. १५ वर्षांपूर्वी पंच कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या पालेकर यांनी २०१८मध्ये भारत-आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत मैदानावरील पंचाची धुरा वाहिली. १ जानेवारी रोजी पालेकर यांनी वयाची ४४ वर्षे पूर्ण केली. २००६पर्यंत आफ्रिकेतील टायटन्स संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी पंचगिरीकडे वळण्याचा निर्णय घेतला.

‘‘जेव्हा मी पंचाची भूमिका बजावण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून एकदा तरी कसोटी सामन्यात पंच म्हणून कार्य करण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. त्यामुळे हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो, त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली,’’ असे पालेकर म्हणाले.

Advertisement

The post पंच अल्लाउद्दीन पालेकर यांची १५ वर्षांनी स्वप्नपूर्ती appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement