नोकरभरतीच्या जीआरची केली होळी: रिकाम्या खुर्च्यांवर PM, CMसह उपमुख्यमंत्र्याच्या नावासमोर राष्ट्रवादीने लावले कंत्राटीचे स्टीकर्स

नोकरभरतीच्या जीआरची केली होळी: रिकाम्या खुर्च्यांवर PM, CMसह उपमुख्यमंत्र्याच्या नावासमोर राष्ट्रवादीने लावले कंत्राटीचे स्टीकर्स


जळगाव9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यात कंत्राटी नोकरभरतीच्या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार गट) आकाशवाणी चौकात पंतप्रधान, मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या चार रिकाम्या खुर्च्या ठेवल्या त्यावर कंत्राटी असे स्टिकर्स चिटकवत ‘त्या’ शासन निर्णयाची होळी केली.

Advertisement

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी महिला कांॅग्रेसच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी युवक कांॅग्रेसचे महानगराध्यक्ष रिकू चौधरी, वाल्मिक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदारांची खरेदी म्हणून नोकरी कंत्राटी असा फलक घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. राज्यात शासनाने कंत्राटी नोकरभरती करण्याबाबत शासन निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाची होळी केली. यावेळी मोदी सरकार व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केळी पिक विम्याचे पैसे न मिळाल्यास काढणार मोर्चा

Advertisement

राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जळगाव, रावेर, यावल, मुक्ताईनगर,चोपडा तालुक्यासह जिल्ह्यातील केळी पिक विम्याची मंजूर रक्कम सरसकट न मिळाल्यास २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी दिला आहे. विमा कंपनी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप… जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दरवर्षी आंबिया बहार फळ पिक विमा ऑटोबरमध्ये काढतात.

त्यात कमी जास्त तापमान, चक्रीवादळ, गारपीट या नुकसानीमुळे शासन निकषाप्रमाणे ऑगस्ट महिन्यात केळी पिक विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे आवश्यक असते. यावर्षीही कमी व जास्त तापमानाने झालेल्या नुकसानीची भरपाई प्राप्त झालेली आहे. विमा कंपनी चौकशीच्या नावाखाली विमा कंपनी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. नुकसान भरपाई मंजूर झाल्यावर केळी पिक विमा कंपनी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप निवेदनाव्दारे करण्यात आला आहे.

AdvertisementSource link

Advertisement