नोंद : आता तस्करी कॅक्टसचीदिगंबर गाडगीळ – [email protected]
ज्या वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी आहे अशा वस्तू चोरून आणल्या की त्यांना मोठी किंमत मिळते. वाघाचे कातडे, हाडे आणि नखे, गेंडय़ाचे शिंग, हस्तिदंत, खवले मांजराचे खवले यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठी मागणी असल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होते. नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या लढवून अशा वस्तूंची तस्करी होते.

Advertisement

अमेरिकेतील जैवविविधता आणि संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आणि कॅक्टसतज्ज्ञ अँड्रिआ कॅट्टाब्रिगा अनेकदा तेथील कस्टम खात्याच्या मदतीला येतात. खास करून चोरून लपवून आणलेल्या दुर्मीळ वस्तू कस्टम खात्याने किंवा टपालखात्याने पकडल्या म्हणजे त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांना पाचारण केले जाते. यावेळी जेव्हा त्यांच्या समोर हजाराहून अधिक दुर्मीळ कॅक्टसचा खजिना उलगडला गेला तेव्हा ते चक्रावूनच गेले. त्या अनमोल कॅक्टसची काळ्या बाजारात किंमत सुमारे १२ लाख डॉलर्स इतकी होती! ती संरक्षित प्रकारात मोडणारी कॅक्टस चिलीहून आणलेली होती. त्यांची निर्यात अवैध होती. त्यातले काही नमुने तर शंभर वर्षांचे होते. गेल्या तीस वर्षांत इतके मोठे घबाड पकडले गेले नव्हते, खरे म्हणजे ही चोरटी आयात फेब्रुवारी २०२० मध्येच उघडकीस आली होती. पण ती आता मे २१ मध्ये जाहीर होत होती, जेव्हा ती कॅक्टस अधिकृतपणे चिलीला परत पाठविली जात होती. त्यावरून केवढी मोठी तस्करी होत असते याची कल्पना येऊ शकते.

कॅक्टसची एवढी मोठी चोरी पाहून कट्टाब्रिगा  फार विषण्ण झाले, कारण लक्षावधी वर्षे परिस्थितीशी झगडत वाळवंटात घर करणाऱ्या कॅक्टसच्या नशिबी असली जीवघेणी विक्री आलेली होती. अशी तस्करी जैवविविधतेच्या मुळावर उठणारी आहे.

Advertisement

जगात कॅक्टसच्या १३० जाती असाव्यात. त्यातील ३० टक्के जाती नामशेष होण्याचा धोका आहे. ‘झाडे जगतील तर मनुष्य जगेल’ हे तत्त्वज्ञान सांगितले जाते, पण वनस्पतीच्या तस्करीकडे फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही जितकी पशुपक्ष्यांच्या तस्करीवर नजर ठेवली जाते; ही वस्तुस्थिती आहे. तस्करांच्या कचाटय़ात कॅक्टसच्या जोडीने आता रसदार (र४ूू४’ील्ल३) वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती सामील झाल्या आहेत.

चिलीतले अराकामा वाळवंट सर्वात शुष्क समजले जाते. तिथे असणारे कॅक्टस संघर्षमय जीवन टिकवून आहेत. तेथील केवढी मोठी जैवविविध संपत्ती पळवली जात होती हे त्यांच्या घरवापसीवरून आता जगासमोर आले आहे.

Advertisement

कॅक्टसच्या जगावेगळ्या आकारामुळे आणि त्यांची फार काळजी घ्यावी लागत नसल्याने घरात ठेवल्या जाणाऱ्या प्रदर्शनी वस्तूंमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. शिवाय प्रदर्शनी वनस्पती विकणाऱ्यांच्या दुकानात त्यांची नेहमी टंचाई असल्याने त्यांची किंमत वाढत जाते. त्यांची दुर्मीळता जेवढी जास्त तितकी ते आपल्या संग्रहात ठेवण्याची धडपड वाढते. त्यातून आता नवश्रीमंतांची संख्या वाढत चालली आहे. त्यांची आपल्या घरी अजब वस्तूंचा संग्रह जोपासण्याची वृत्ती वाढीस लागते. त्यासाठी सढळ हात सोडताना काही वाटत नाही. किंबहुना आपला संग्रह किती दुर्मीळ आणि महागडा आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तो एक ‘स्टेटस सिंबॉल’ होतो.

कॅक्टसच्या काही जाती ‘प्रदेशनिष्ठ’ असतात. त्या दुसरीकडे कुठे सापडत नाहीत. उदा. मेक्सिकोतील चुनखडी कपारीत किंवा पेरूच्या वाळवंटात केवळ काही चौरस मैल पट्टय़ातच होणारी कॅक्टस. त्यांची वाढ अगदी मंद असते. की त्यातले मोठे नमुने पाच पंचवीसच काय शेकडो वर्षांचे जुने असतात. त्यांच्यावर तस्करांचा डोळा असतो.

Advertisement

दुर्मीळ कॅक्टस कायदेशीररीत्या मिळवणे जवळजवळ अशक्य असते. सक्युलंटची विक्री करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना मिळवावा लागतो. बहुतेक सर्वच देशांत वन्य वस्तू बाळगण्यावर बंदी आहे. जपानमध्ये दुर्मीळ, संरक्षित, वन्य वनस्पती प्रदर्शित करणारी काही दुकाने आहेत. जगभराचे विक्रेते ई-बे, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जाहिरात करत असतात. अशा जाहिरातींबाबत खुलासा असतो की कॅक्टससोबत वैध व्यापारासाठीचा परवाना असत नाही. तस्कर कधी कधी जागेवरच्या दृश्यांचे व्हिडीओ टाकून त्यापैकी कोणते वाण हवे अशी पृच्छा करतात. तस्कर बहुधा कधीच पकडले जात नाहीत. अमेरिकन, ब्रिटिश, युरोपियन आणि जपानी संग्राहक हा अवैध धंदा हाताळतात. अलीकडे चीन, कोरिया आणि थायलंडमधील  काही जण तिकडे वळले आहेत. असा अवैध व्यापार नेमका किती होतो, हे सांगणे दुरापास्त आहे. गेल्या वीस वर्षांत त्यात वाढ झाली आहे.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खबर मिळाल्यावर पोलिसांनी अ‍ॅड्रिआटिक किनाऱ्यावरील सेनिगॅल्लिआ या ठिकाणाच्या अँड्रिया पिओमवेट्टी या कॅक्टस संग्राहकाच्या घरी भेट दिली. तिथे तात्पुरत्या स्वरूपातील ग्रीन हाऊसमध्ये त्यांना चिलीमध्ये संरक्षित असणारी सुमारे एक हजार कॅक्टस सापडली. ती कोपिआपोआ आणि शुटेओसी जातीची होती. त्यांचा आकार बीचबॉल ते बेसबॉल एवढा होता. पोलिसांनी हा सगळा माल जप्त केला. शिवाय पिओमबेट्टीचा सेलफोन आणि पासपोर्टही ताब्यात घेतला. तो खटला अजून उभा राहायचा आहे. यापूर्वीही २००३ साली त्याच्याकडे जहाजातून आलेली ६०० चिलीमधील कॅक्टस पकडली गेली होती. पण सरकारी दप्तर दिरंगाईमुळे लिमिटेशन कायद्याच्या मुदतीत खटलाच उभा राहू शकला नव्हता. इटलीतील पर्यावरणविषयक गुन्हे चार पाच वर्षांच्या आत न्यायालयात पोचू शकले नाहीत तर गुन्हेगारांना शिक्षाच होऊ शकत नाही. या वेळी अशी चूक होणार नाही असे वन्य प्राणी विभागप्रमुख लेफ्टनंट कर्नल सिमोन चेचिनी यांनी आश्वासन दिले आहे. पाहू या काय होते ते.

Advertisement

कॅट्टाब्रिगा आणि इतर तज्ज्ञांनी अनेक चाचण्या घेऊन ही कॅक्टस घरगुती पद्धतीने वाढवलेली नसून चिलीतील अटाकाम वाळवंट क्षेत्रातील, वन्य क्षेत्रातीलच आहेत असा निर्वाळा दिला आहे. पोलीस तपासात संशयित पिओमबेट्टी यांनी चिलीला सहा वेळा भेटी दिल्याचे उघड झाले आहे. त्याशिवाय ही कॅक्टस त्याने ग्रीस आणि रोमानिया देशातील पत्त्यांवर मागवली होती हे उघड झाले. या देशांतील कस्टम खाते फारसे तल्लख नाही हे त्याला ठाऊक होते. पोष्टरच्या दीर्घ प्रवासात ती कॅक्टस हवा, पाणी, जमीन यांच्या सान्निध्यात नसूनही त्यांच्या अंगभूत कणखर गुणांमुळे सुखरूप पोचली होती. पिओमबेट्टीच्या सेलफोनवरील संभाषणांतून त्यांची किंमत दहा लाख युरो डॉलर्स असल्याचा अंदाज बांधता आला. सेलफोनवरील संभाषणातून आणि त्यात मिळालेल्या पावतीवरून जपानमधील एक कंपनी दरमहा मोठय़ा ऑर्डर्स देते हेही उघड झाले. ही कॅक्टस सुरक्षित राहावी म्हणून त्यांची रवानगी मिलानमधील वनस्पती उद्यानात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली.

इटलीत पकडली गेलेली कॅक्टस सामान्यत: नष्ट केली जातात. त्यातून जी दुर्मीळ असतील ती इटलीतील काही वनस्पती उद्यानात ठेवली जातात. पण ‘ऑपरेशन अराकामा’मध्ये धरली गेलेली कॅक्टस मोठय़ा संख्येने असल्याने आणि त्यातली काही अतिदुर्मीळ असल्याने केवळ काही किलोमीटरच्या पट्टय़ातच मिळत असल्याने सद्हेतू स्वरूपात ती चिलीला परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेण्यासाठी या खात्यातून त्या खात्याकडे विचारणा, मंजुरी घेण्यात २०२० साल वाया गेले. निर्णय तर झाला पण त्यांच्या पाठवणीसाठी ३६०० युरो डॉलर्स एवढा खर्च येणार होता. इटली सरकार त्यासाठी तयार नव्हते आणि आश्चर्य म्हणजे चिली सरकारनेही हात वर केले! पण शेवटी कवउठ ने ७५ टक्के खर्च दिला, बाकी रक्कम एका विक्रेत्याने दिली. तो विक्रेता पर्यावरण संस्थांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे येत असतो.

Advertisement

या छाप्यात धरल्या गेलेल्या कॅक्टसपैकी साधारण १०० मृत झाली. अभ्यासासाठी ८४ नमुने ठेवण्यात आले. उरलेली ८४४ कॅक्टस बोटीतून रवाना झाली. प्रवासात त्यांची देखरेख व्यवस्थित होते आहे हे पाहण्यासाठी कॅट्टाब्रिगा रोजच्या रोज सूचना पाठवीत. चिलीत पोचल्यावर त्यांना काही काळ विलगीकरणात घालवावा लागणार होता, तेव्हाही कॅट्टाब्रिगांच्या सूचना चालूच होत्या. अखेर वनखात्याच्या तपासणीनंतर ती कॅक्टस त्यांच्या मूळ जागी स्थानापन्न होतील, जे स्थान सोडण्याची गरज नव्हती त्या स्थानी ती परत पोहोचलेली असतील.

इटलीतील या मोठय़ा व्यवहारामुळे एक झालं, जगातील अनेक देशांचं लक्ष कॅक्टसच्या अवैध व्यापाराकडे वळलं. अमेरिकेत सहा तस्करांना शिक्षा दिली गेली. कॅलिफोर्निया आणि अ‍ॅरिझोनामध्ये तातडीने खटले उभे राहिले.

Advertisement

The post नोंद : आता तस्करी कॅक्टसची appeared first on Loksatta.Source link

Advertisement