निसर्गचक्र पूर्वपदी आणणे ही सामुहिक गरज: बबलू गांगुलींचे मत, ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

निसर्गाच्या संवर्धनात मनुष्य पुन्हा एकदा सक्रीय होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. खूप मोठा मानवी समुदाय निसर्गाचे संरक्षण, संवर्धन, पुनर्निर्मिती आणि देखभाल हे घटक लक्षात घेऊन कामाला लागलेला आहे. निसर्गाच्या संवर्धनात आपण एकत्रितपणे पुन्हा एकदा काम करण्यास सुरूवात केल्यास बिघडलेले निसर्गचक्र आपण पुन्हा सुधारू शकतो, असा आशावाद गेल्या 40 वर्षांपासून अन्नसुरक्षा या विषयात कार्यरत असलेल्या आंध्र प्रदेश येथील टिंबकटू कलेक्टीव्ह फाऊंडेशनचे प्रमुख बबलू गांगुली यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

Advertisement

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे आयोजित 16 व्या ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी आंध्र प्रदेश येथील टिंबकटू कलेक्टीव्ह फाऊंडेशनचे प्रमुख बबलू गांगुली यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतुल किर्लोस्कर, महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे आणि डॉ. गुरूदास नूलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

गांगुली म्हणाले की, निसर्ग आणि मनुष्य एकमेकांना पूरक आहेत. परंतु, आपण ज्या निसर्गाचा ऱ्हास करीत आहोत, त्याचाच आपण एक अंश असल्याचे मनुष्य विसरत आहे, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. निसर्गाच्या ऱ्हासाबरोबरच आपण आपला देखील विनाश ओढवून घेत आहोत, याची पुसटशीही कल्पना आपल्याला येऊ नये, हे आश्चर्यकारक आहे. आपण निसर्गापासून स्वतःला खूप विभक्त करून घेतले आहे.निसर्गावर होणाऱ्या सर्व विपरित परिणामांचा थेट परिणाम मनुष्यजातीवर देखील होणार आहे.

Advertisement

आंध्र प्रदेशच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या 4 दशकांपासून मी काम सुरू केले आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी कुमार आप्पा यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी विपूल लेखन आणि विवेचन करून ठेवलेले आहे. ते समजून घ्यायाचा प्रयत्न मी गेल्या 12-13 वर्षांपासून करीत आहे. मी आणि माझे सहकारी निसर्गपूरक शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठी खेड्याकडे वळालो. आपल्याला स्वप्नवत वाटणारे प्रारूप निर्माण करण्याच्या कार्यात जुंपले गेलो.

अनंतपूर जिल्ह्यातील उजाड आणि पडीक जमिनीवर आम्ही शेतीप्रयोग राबविण्यास आम्ही सुरुवात केली. त्या शेत जमिनीचे आरोग्य ढासळलेले असल्याने सुरूवातीला त्या शेत जमिनीतून काहीह उत्पादित होत नव्हते. आम्ही त्या जमिनीची मशागत केली. गेल्या अनेक शतके आपण निसर्गाचे संवर्धन करण्याऐवजी आपण निसर्गाला ओरबाडत आहोत. टिंबकटू चळवळीच्या माध्यमातून आम्ही आजूबाजूच्या खेडे गावांसमोर निसर्गपूरक जीवनशैलीचे प्रारूप मांडले.

Advertisement

टिंबकटू चळवळीच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाची एक चळवळ उभी राहिली असली नऊ खेडेगावांव्दारे सात हजार एकर जमिनीवर या प्रारूपाचा विस्तार झाला आहे. 1991 साली अवघ्या 21 जातींच्या वनस्पतींचे संरक्षण केल्यानंतर आज या वनस्पतींच्या जातींची संख्या 400 इतकी झाली आहे. यावेळी बोलताना अतुल किर्लोस्कर म्हणाले की, जीवनाच्या शाश्वततेसाठी आपल्याला पर्यावरणपूरक अर्थकारण स्वीकारावे लागेल.

कोरोना काळात आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे कोलमडली याचा आपण अनुभव घेतलाच आहे. प्रयत्नपूर्वक आपण या संकटावर मात केलेली आहे. पण वारंवार आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारे हे आघात आपण सहन करू शकणार नाही. निसर्गाच्या हातात हात घालून विकासाचे ध्येय कसे साध्य करता येईल, यादृष्टीने हा प्रवास सुरू आहे.

Advertisement

पारंपारिक ऊर्जा निर्मितीला मर्यादा असून निसर्गाला हानी पोहोचवणारे असून हायड्रोजन, बायोगॅससारखे अनेक निसर्गपूरक पर्याय अलीकडे आपल्याला उपलब्ध आहेत. त्याची व्यावहारिकता तपासून पाहणे अद्याप सुरू असून ते एक आव्हान आहे. आता स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक पर्यावरणपूरक पर्याय पुढे येत असून निसर्गाची हानी न होता विकासाचे उद्दिष्ट गाठण्यात हातभार लागत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement