निवृत्तीनाथ यात्रेसाठी सिटीलिंकच्या 35 बसेसद्वारे 246 फेऱ्या: नाशिक मनपातर्फे जादा बसचे नियोजन; एसटीच्यावतीनेही जादा बसेसची सोय


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 246 Trips By 35 Buses Of CityLink For Nivrutinath Yatra, Planning Of Additional Buses By Nashik Municipal Corporation; Additional Buses Are Also Provided By ST Corporation

नाशिक31 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवानिमीत्त लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर याठिकाणी श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहे. पायी दिंडी आधीच त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असल्या तरी बुधवारी दि. 17 हजारो भाविक त्र्यंबकेश्वर याठिकाणी दर्शनासाठी जाणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement

सद्यस्थितीत सिटीलिंकच्या वतीने तपोवन आगरातून 15 बसेसच्या माध्यमातून 106 बस फेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात तर नाशिकरोड आगारतून 10 बसेसच्या माध्यमातून 60 बसफेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात. या नियमित बसफेर्‍यांव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर यात्रोत्स्वानिमित्त तपोवन आगारातून 6 बसेसच्या माध्यमातून 48 तर नाशिकरोड आगारातून 4 बसेसच्या माध्यमातून 32 अश्या एकूण 10 जादा बसेसच्या माध्यमातून 80 जादा बसफेर्‍यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. 18 जानेवारी व दिनांक 19 जानेवारी असे दोन दिवस जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. जादा बसेस मिळून 18 व 19 जानेवारी रोजी रोज तपोवन आगारातून एकूण 21 बसेसच्या माध्यमातून 154 बसफेर्‍या तर नाशिकरोड आगारातून 14 बसेसच्या माध्यमातून 92 बसफेर्‍या नियोजित आहे. एकूणच दोन दिवसांत रोज 246 बसफेर्‍या भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मार्गावर कार्यरत असणार आहे.यात्राेत्सवाच्या काळात भाविकांना काेणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण हाेवू नये या दृष्टीने सिटीलिंकच्या वतीने नियाेजन करण्यात आले आहेे. तसेच याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने देखील नियोजन

Advertisement

त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या वतीने देखील जादा बसेसचे देखील नियाेजन करण्यात आलेले आहे. प्रवाशांच्या गर्दीनुसार टप्पाटप्याने जादा बसेस साेडण्यात येणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement